नवी दिल्ली : पॅरिसमध्ये शनिवारी रात्री झालेला ऐतिहासिक करार म्हणजे हवामानाला दिलेला न्याय (क्लायमेट जस्टिस) होय. या कराराची निष्पत्ती ही कुणासाठी जय किंवा पराजय ठरत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले. कॉन्फरन्स आॅफ पार्टीज (सीओपी)-२१ या कराराप्रत पोहोचण्यासाठी प्रत्येक देशाने आव्हानांवर मात केली. हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्व जागतिक निष्पत्तीमुळे कुणाचा विजय किंवा पराभव झालेला नाही. हा हवामानाचा विजय आहे. आपण सर्वजण हरित भविष्याच्या दिशेने काम करू, असे त्यांनी टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोई ओलांद यांनी मोदींना फोनवरून कराराची माहिती दिली. मोदींनी ओलांद यांना धन्यवाद दिल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद आहे.भारताकडून स्वागतभारताने हवामान बदलाच्या कराराचे स्वागत करताना ऐतिहासिक अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असली तरी विकसित देशांनी अधिक जबाबदारी घेतली असती तर हा करार जास्त फलदायी व महत्त्वाकांक्षी ठरला असता, असे मत व्यक्त केले आहे.केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, भारतासारख्या विकसनशील देशांच्या विकासाच्या गरजा विचारात घेऊन हा करार झालेला आहे. आपल्यासारख्या देशाच्या विकासाचा अधिकारही त्यात मान्य झाला, हे विशेष आहे. इतकेच काय अधिक गरीब देशांच्या हिताचा विचारही यात करण्यात आला आहे. आज ऐतिहासिक दिवस असून, हा केवळ करार नाही तर सात अब्ज लोकांच्या जीवनात आम्ही एक नवा अध्याय जोडला आहे. त्यामुळे भावी पिढयांचे भविष्य निश्चितच सुरक्षित राहील. (वृत्तसंस्था)पृथ्वी रक्षणाची सर्वश्रेष्ठ संधीवॉशिंग्टन : हवामान बदल करार विश्वासाठी निर्णायक क्षण असून पृथ्वी रक्षणासाठी मानवतेसमोर आलेली सर्वश्रेष्ठ संधी आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली. सर्व प्रतिनिधींच्या प्रयत्नांची प्रशंसा करीत ते म्हणाले की, सर्व एकत्र उभे राहिले तर काय घडू शकते हे या कराराने स्पष्ट झाले. ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, आपली वसुंधरा आता चांगल्या अवस्थेत राहील अशी आशा करायला हवी. हवामान बदल परिषद यशस्वी व्हावी यासाठी ओबामा यांनी जोरदार प्रयास केले होते. त्यांनी यासाठी पॅरिस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांची भेट घेतली होती.
जय, परायज नव्हे हा हवमानाला न्याय
By admin | Updated: December 14, 2015 02:17 IST