शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तानात जाऊन जाधव यांचा खटला लढवेन- अॅड. उज्ज्वल निकम

By admin | Updated: April 16, 2017 17:19 IST

ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - भारतीय नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांचा खटला चालवणा-या वकिलांना लाहोर बार काऊन्सिल (लाहोर वकील संघ)नं परवाना रद्द करण्याची धमकी दिली असतानाच भारतातले नावाजलेले आणि ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणात पाकिस्तानात जाऊन त्यांचा खटला लढवण्यास तयार असल्याचं ते म्हणाले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी पाकिस्तानवर टीकाही केली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले, पाकिस्तान हा अस्थिर सरकार असलेला देश आहे. कुलभूषण जाधव यांना कोणालाही न भेटण्याच्या पाकिस्ताननं दिलेल्या निर्णयाचं मला आश्चर्यच वाटतं. उज्ज्वल निकम यांनी जाधव प्रकरणावरून पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला काऊन्सिलर एक्सेस न देणे हे सिद्ध करतं की, जाधव यांचा कथित जबाब हा दबावाखाली घेण्यात आला. पाकिस्तानची पोलखोल होऊ नये म्हणूनच पाकिस्तान जाधव यांना कोणालाही भेटण्यास देत नाही. त्यामुळे पाकिस्तानची प्रवृत्ती समोर आली आहे. पाकिस्ताननं जाधवसंदर्भात काय पुरावे आहेत ते सांगावं ?, असा प्रश्नही उज्ज्वल निकम यांनी पाक सरकारला विचारला आहे. पाकिस्तान आणि भारताचे कायदे जवळपास एकसारखेच आहेत. जर एखादा आरोपी स्वतःच्या जबाबावर कायम न राहिल्यास दुस-या पक्षकाराला आरोपीच्या विरोधात पुरावे द्यावे लागतात. त्यामुळेच जाधव यांना जगासमोर आणलं जात नाही. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आतापर्यंत पाकिस्ताननं जाधव यांच्यासंदर्भात कोणत्याही माहितीची सार्वजनिकरीत्या भारतासोबत देवाणघेवाण केली नाही. पाकिस्तानला 13 वेळा बार अपील करण्यासाठी सांगण्यात आलं असून, पाकिस्ताननं प्रत्येक वेळी अपील फेटाळून लावलं आहे.