शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 22 जखमी

By admin | Updated: March 30, 2017 09:39 IST

उत्तर प्रदेशमधील माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमत 

लखनौ, दि. 30 -  उत्तर प्रदेशमध्ये माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. जबलपूरहून निजामुद्दीनकडे निघालेल्या महाकौशल एक्सप्रेसला गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास माहोबा-कुलपहाड स्टेशनांदरम्यान हा अपघात घडला.

जबलपूरहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी महाकौशल एक्स्प्रेस माहोबाजवळीस चरखारी रेल्वेस्टेशनाजवळ एक्स्प्रेसचे मागील आठ डबे रुळावरून घसरले. अपघातग्रस्त झालेल्या डब्यांमध्ये तीन एसी आणि तीन सामान्य वर्गातील डब्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. रात्रीच्या दाट अंधारात मदत आणि बचाव कार्यं सुरू आहे. ( आंध्र प्रदेशात रेल्वे अपघातात ३९ ठार )

 

याबाबत अधिक माहिती देताना एसपी गौरव सिंग यांनी या अपघातात कुणाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. तर अपघातात जखमी झालेल्या 10 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
( कानपूर रेल्वे अपघातामागे पाकिस्तानचा हात? )
 
गेल्या काही काळापासून सातत्याने रेल्वे अपघात होत असून, 22 जानेवारीला आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यातील कोनेरू स्टेशनजवळ जगदलपुर- भुवनेश्वर हीराखंड एक्सप्रेस (18448) अपघातग्रस्त होऊन 32 जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमधील कानपुरजवळ पुखराया येथे झालेल्या रेल्वे अपघातात 150 हून अधिक प्रवाशांना प्राणास मुकावे लागले होते.