शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर हा पूर्वनियोजित खून ठरेल : भारत

By admin | Updated: April 11, 2017 04:41 IST

कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानले जाईल, अशा तिखट शब्दांत भारताने आपली भूमिका पाकिस्तानला कळविली.परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले आणि भारताच्या तीव्र प्रतिक्रियेचा खलिता त्यांच्याकडे सापविला. बासित यांनी तो पाकिस्तान सरकारकडे पोहोचविणे अपेक्षित आहे.कायदा आणि न्यायाच्या मुलभूत तत्त्वांचे पालन न करता खटला चालवून दिलेल्या या शिक्षेनुसार जाधव यांना फाशी दिली गेली तर भारत सरकार आणि भारतीय जनता पाकिस्तानने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानेल, असेही बासित यांना स्पष्टपणे बजावण्यात आले.खटल्यात जाधव यांना बचावाची पूर्ण संधी देण्यात आली व बचावासाठी वकिलही देण्यात आला हा पाकिस्तानचा दावा धादान्त फसवा असल्याचे नमूद करता बासित यांना असेही सांगण्यात आले की, जाधव यांना राजनैतिक प्रतिनिधीमार्फत मदत देण्याची भारताने १३ वेळा केलेली विनंती पाकिस्तानने अमान्य केली. एवढेच नव्हे तर जाधव यांच्यावर खटला चालविला जात आहे, हे तेथील भारतीय उच्चायोगाला कळविण्याचे सौजन्यही पाकिस्तानने दाखविले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)अपहरण करून पाकिस्तानात नेलेजाधव यांस बलुचिस्तानात ‘हेरगिरी’ करताना पकडण्यात आले हेही पाकिस्तानने रचलेले एक कुभांड आहे. मुळात कुलभूषण जाधव त्या देशात गेले कसे याचा कोणताही समाधानकारक खुलासा पाकिस्तानने कधीही केला नाही. प्रत्यक्षात जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले होते, असा आरोप भारताने केला आहे.