शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ यानाचा फेरवापर शक्य?

By admin | Updated: June 16, 2015 02:27 IST

सर्वाधिक कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करून अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात जगभरात आपला ठसा उमटविणाऱ्या भारतीय अंतराळ

नवी दिल्ली : सर्वाधिक कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करून अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात जगभरात आपला ठसा उमटविणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आता समुद्रात कोसळणारे अंतराळ यान पुन्हा प्रक्षेपणासाठी वापरता येईल असे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असून याची पहिली चाचणी पुढील महिन्यात होणार आहे.इस्रोकडून यावर्षी सप्टेंबरपर्यत अंतराळ विज्ञानासाठी समर्पित भारताचा पहिला उपग्रह ‘अ‍ॅस्ट्रोसेट’चेही प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी अंतराळ विभागाच्या वर्षभराच्या कारकीर्दीचा लेखाजोखा सादर करण्यासाठी सोमवारी पत्रपरिषद आयोजित केली होती. त्याप्रसंगी उपरोक्त माहिती देण्यात आली. अंतराळ यान फेरवापराच्या या तंत्रज्ञानामुळे इस्रोचा प्रक्षेपण मोहिमेवरील खर्च ९० टक्के कमी करता येईल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळ मोहिमेच्या यशामुळे अंतराळ क्षेत्रात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे याकडे लक्ष वेधताना सिंग म्हणाले, पुढील वर्षी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टम (आयआरएनएसएस) शृंखलेतील दोन उपग्रहांचे आणि त्यानंतरच्या वर्षी तीन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अंतराळ विभागातर्फे गेल्या वर्षभरात ११ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)