शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘ते’ हस्ताक्षर गजेंद्रचे नाहीच; कुटुंबाचा दावा

By admin | Updated: April 23, 2015 23:46 IST

आपच्या रॅलीत आत्महत्या करणारा शेतकरी गजेंद्रसिंग रावत याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रातील हस्ताक्षर त्याचे नसल्याचा दावा कुटुंबियांनी केल्यामुळे

नवी दिल्ली/दौसा : आपच्या रॅलीत आत्महत्या करणारा शेतकरी गजेंद्रसिंग रावत याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रातील हस्ताक्षर त्याचे नसल्याचा दावा कुटुंबियांनी केल्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी हे पत्र तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहे.दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही या आत्महत्येसाठी आप नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. आप नेत्यांनीच गजेंद्रसिंगला आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्याच्या बचावासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमध्ये सर्व प्रकारचे अडथळे निर्माण केले, असा पोलिसांचा आरोप आहे.गजेंद्रसिंगच्या पार्थिवावर गुरुवारी दौसा जिल्ह्यातील नांगल झमरवाडा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस व आप कार्यकर्त्यांनी वेळीच दखल घेतली असती तर गजेंद्रसिंगचा मृत्यू टळला असता असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.पिकाच्या नुकसानामुळे गजेंद्रसिंग चिंतेत असला तरी आत्महत्या करण्याची त्याची मानसिकता नव्हती. रॅलीतीलच काही लोकांनी त्याला यासाठी उद्युक्त केले असण्याची शक्यता गजेंद्रसिंग यांचे मेहुणे सुरेंद्रसिंग यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, गजेंद्रसिंग याची पार्श्वभूमी, दिल्लीत येण्यामागील कारण आदी माहिती मिळविण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पथक दौसाच्या नांगल झमरवाडा गावात पाठविण्यात आले आहे. याशिवाय त्याच्या मोबाईल रेकॉर्डची तपासणी सुरू आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांना अहवाल सादर केला असून गुन्हे शाखेचे तपास पथक गजेंद्रसिंगच्या गावी रवाना झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), १८६ (सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणणे) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.