नवी दिल्ली : सध्याच्या युगात माहितीच्या प्रसारणावर निर्बंध (सेन्सॉरशिप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आणि माध्यमांकडे ठोस असे आर्थिक मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार झिरपत राहण्याची शक्यता आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.आधुनिक तंत्रज्ञानामुळे बातमीची व्याख्या आणि ग्राहकाची वर्तणूक बदलली आहे. या दिवसांत कॅमेऱ्यात जे बंदिस्त होत नाही, अशा बाबीला बातमीमूल्य उरलेले नाही. थोडक्यात, कॅमेऱ्यात दिसत नसेल तर ती बातमी ठरत नाही. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. सर्व वृत्तसंस्थांसाठी आर्थिक मॉडेल हे प्रत्यक्षात उतरले जावे. तसे होत नाही ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच पथभ्रष्टतेचा मार्ग अवलंबला जाण्याची भीती असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रसार माध्यमांवर निर्बंध लावणे अशक्य- जेटली
By admin | Updated: January 16, 2015 05:10 IST