शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चामुळे इफ्तार पार्टीला जाणे अशक्य -लालूप्रसाद

By admin | Updated: July 11, 2015 00:31 IST

राजद आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदामुळे आपण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातर्फे १३ जुलै रोजी दिल्लीत आयोजित

पाटणा : राजद आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदामुळे आपण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातर्फे १३ जुलै रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत हजर राहणार नसल्याच्या वृत्ताचे राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी खंडन केले.‘सोनिया गांधी यांनी मला या इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिलेले आहे; परंतु १३ जुलै रोजी आम्ही पाटण्याच्या राजभवनवर धडक मोर्चा आयोजित केलेला असल्याकारणाने इफ्तार पार्टीला येऊ शकत नाही, असे मी विनम्रपणे सोनिया गांधी यांना कळविले आहे,’ असे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. सामाजिक-आर्थिक-जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवाय १३ जुलै रोजीच आम्हीदेखील पाटण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे, असे सांगून लालूप्रसाद म्हणाले, सोनिया गांधी यांच्या इफ्तार पार्टीला हजर राहण्यास असमर्थ असल्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. असा चुकीचा अर्थ काढणारे लोक आमच्या विरोधातील घटकांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले नसते, तर आपण सोनिया गांधी यांच्या इफ्तार पार्टीत अवश्य हजर राहिलो असतो; पण आता मी जरी जाणार नसलो तरी माझा प्रतिनिधी म्हणून खासदार प्रेमचंद गुप्ता आणि खासदार जयप्रकाश यादव यांना पाठविणार आहे.दोन्ही इफ्तार पार्टी एकाच तारखेला आयोजित करण्यात आल्याबद्दल आपण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही चर्चा केली आणि सर्व प्रकारच्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सोनिया गांधी यांच्या इफ्तार पार्टीला जाण्याची सूचना आपण त्यांना केली आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)