शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही निर्दोष मुक्त करणे महत्त्वाचे -सुप्रिम कोर्ट

By admin | Updated: February 20, 2016 02:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविणे महत्त्वाचे आहे. येथे निर्दोष ठरविण्यात आल्यास त्यावर एकदाच आणि कायमचे शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट करीत न्या. जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविणे महत्त्वाचे आहे. येथे निर्दोष ठरविण्यात आल्यास त्यावर एकदाच आणि कायमचे शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट करीत न्या. जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सलमान खान याला २००२ च्या ‘हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी’ नोटीस बजावली.उच्च न्यायालयाने दोन मुद्यांवर चूक करीत सलमानची निर्दोष मुक्तता केली असल्याचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडताना नमूद केले. मुंबईत २००२ साली सलमानच्या कारखाली पदपथावरील एक जण चिरडून ठार झाला होता. न्या. जे.एस. खेहार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नोटीस जारी करीत सलमानला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. सलमानच्या वकिलांनी उत्तरासाठी सहा आठवड्यांची मुदत मागितली आहे. सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविले. महाराष्ट्र सरकार आणि पीडित कुटुंबाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पुरावे नाहीत- सिब्बल...सलमानला कनिष्ठ न्यायालयाने केवळ एका साक्षीच्या आधारावर दोषी ठरविले होते. त्यावर अवलंबून राहता येत नाही, सलमान कार चालवत असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. सिब्बल यांनी केवळ एका साक्षीदाराचा उल्लेख केला असला तरी घटनेवेळी अनेक साक्षीदार होते. त्यांनी सलमानला चालकाच्या सीटवर बघितले होते, असे रोहतगी म्हणाले. (वृत्तसंस्था)