शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

इस्रो घेणार भरारी; आज झेपावणार स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल!

By admin | Updated: May 23, 2016 04:11 IST

अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या अवकाशयानाची (स्पेस शटल) पहिली चाचणी सोमवारी होणार आहे. पुन्हा वापर करता येईल, असे अवकाशयान तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर इस्रोने काम

चेन्नई : अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या अवकाशयानाची (स्पेस शटल) पहिली चाचणी सोमवारी होणार आहे. पुन्हा वापर करता येईल, असे अवकाशयान तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर इस्रोने काम केले असून, ही चाचणी म्हणजे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रोने ‘आरएलव्ही-टीडी’ हे यान तयार केले आहे. विमानासारखे पंख असलेल्या या यानाची श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाशतळावर चाचणी होणार आहे. उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर यानाला विमानाप्रमाणे पुन्हा पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानावर इस्रोने काम केले असून, उद्याच्या चाचणीतून त्याचे निष्कर्ष जगासमोर येणार आहेत. याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने त्याला होणारे अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितांमुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली वा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी मात्र काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर देण्याचे ठरवले आहे.फायदा काय?ही चाचणी यशस्वी झाल्यास एखादा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्यासाठी वापरलेल्या यानाचा पुन्हा वापर करणे शक्य होईल. या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकेल.दशकभराचा कालावधी लागेल आरएलव्ही-टीडी यानाची ही प्राथमिक चाचणी असल्याने हे यान उद्या नियंत्रितपणे बंगालच्या खाडीत उतरवण्यात येणार आहे. या चाचणीचा कालावधी दहा मिनिटांचा असेल. स्वदेशी बनावटीचे, पूर्णपणे विकसित आणि पुन्हा वापरता येण्याजोगे अवकाशयान तयार करण्यासाठी दशकभराचा कालावधी लागेल, असे विक्र म साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. सिवान यांनी सांगितले.