शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोमुळे मिळणार भारतातील इंटरनेटला गती

By admin | Updated: May 21, 2017 17:46 IST

गेल्या काही वर्षात भारतातील इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  गेल्या काही वर्षात भारतातील  इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. देशातील इंटरनेटची गती वाढवण्यासाठी इस्त्रो तीन उपग्रह सोडणार आहे. हे उपग्रह कार्यान्वीत झाल्यावर भारतातही हायस्पीड इंटरनेट सेवा देणे शक्य होणार आहे. 
 
यासंदर्भात माहिती देताना इस्रोचे प्रमुख किरण कुमार म्हणाले, "आम्ही तीन दूरसंचार सॅटेलाइट्स प्रक्षेपित करणात आहोत. येत्या जून महिन्यात जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण होईल. त्यानंतर जीएसएटी - 11 आणि जीएसएटी -20 यांचे प्रक्षेपण होईल. त्यापेकी जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण इस्रोचा पुढील पिढीतील प्रक्षेपक जीएसएलव्ही एमके III याद्वारे केले जाईल. या उपग्रहांमध्ये मल्टिपल स्पॉट बीमचा वापर करण्यात येईल. ज्यामुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल. ही मल्टिपल स्पॉट बीम संपूर्ण देशाला आपल्या कक्षेत घेईल." 
हे उपग्रह कार्यान्वित झाल्याबरोबर उच्च दर्जाची इंटरनेट सेवा, फोन आणि व्हिडिओ सर्व्हिस देण्यास सुरुवात करतील. अशी माहिती अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे तपन मिश्रा यांनी सांगितले. 
 
सध्या  भारत हायस्पीड इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत खूप पिछाडीवर आहे. वेगवान इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत भारताला सध्या 105 वे स्थान प्राप्त झाले आहे. तर या क्रमवारीत दक्षिण कोरिया 26 एमबीपीएस वेगासह अव्वलस्तानी आहे. या क्रमवारीत श्रीलंका, व्हिएटनामसारखे देशही भारताच्या पुढे आहेत.