शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन ISRO रचणार इतिहास

By admin | Updated: February 11, 2017 09:10 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो येत्या 15 फेब्रुवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 11 - नेहमीच समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो येत्या 15 फेब्रुवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्त्रो PSLV C 37 या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर करणार आहे. 
एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे. जुलै 2014 मध्ये रशियाने एकाचवेळी 37 उपग्रह प्रक्षेपित केले होते.  बुधवारी सकाळी 9.28 मिनिटांनी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन PSLV C 37 मधून 104 उपग्रहांचे प्रक्षेपण होईल. पृथ्वी निरीक्षण करणा-या मालिकेतील कार्टोसॅट -2 हा मुख्य उपग्रह असून त्याचे वजन 714 किलो आहे. 
 
अन्य 101 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. अमेरिकेतील खासगी कंपनीचे 96 नॅऩो उपग्रह असून, इस्त्रायल ,कझाकिस्तान, युएई, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. त्याशिवाय भारताच्या दोन नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. या सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन 1378 किलो आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाचे हे 39 वे उड्डाण असेल.