शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दौऱ्यासाठी इस्रायलच्या पायघड्या

By admin | Updated: July 4, 2017 06:10 IST

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी इस्रायलने लाल पायघड्या अंथरल्या असून, मोदींचे पाय तेल अवीवच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी इस्रायलने लाल पायघड्या अंथरल्या असून, मोदींचे पाय तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाला लागण्यापूर्वीच, मध्य-पूर्वेतील या देशाने या भेटीला ‘यशस्वी व ऐतिहासिक’ असे संबोधले आहे.यातील यशाचा भाग तीन दिवसांचा दौरा संपल्यानंतर स्पष्ट होईल, परंतु हा दौरा ऐतिहासिक आहे, हे मात्र नक्की. ७० वर्षांपूर्वी साधारणत: एकाच वेळी नवराष्ट्र म्हणून उदयास आलेल्या या दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन २५ वर्षे होत आहेत. त्याचे औचित्य साधून हा दौरा आखण्यात आला असून, कोणाही भारतीय पंतप्रधानांचा पहिला इस्रायल दौरा म्हणून त्यास आगळे महत्त्व आहे.दोन्ही देशांमध्ये दौऱ्याच्या पूर्वसंध्येस कमालीचे औत्सुक्य व मैत्रीभाव दिसून आला. भारताकडून मोदी व इस्रायलकडून बेंजामिन नेत्यानाहू या दोन्ही पंतप्रधानांनी समाजमाध्यमांतून या भावना व्यक्त केल्या आणि या भेटीने द्विपक्षीय संबंध अधिक बळकट आणि बहुआयामी होतील, असा विश्वास व्यक्त केला. नेत्यानाहू यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘माझे मित्र नरेंद्र मोदी उद्या येत आहेतव ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान असल्याने, त्यासाजेचे आदरातिथ्य करण्यासाठी मी स्वत: त्यांच्या अनेक कार्यक्रमांना हजर राहणार आहे.’ बरेच काही शिकण्यासारखे माझा इस्रायल दौरा अनेक क्षेत्रांमध्ये असलेले द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करेल व दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये अधिक जवळीक निर्माण करेल. जगाने इस्रायलकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान