शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

‘इसिस’ त्यांच्याच तंत्राने उद्ध्वस्त

By admin | Updated: January 25, 2016 03:12 IST

प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचणाऱ्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिसला गुप्तचर संस्थांनी त्यांच्याच ‘शस्त्रा’ने मात दिली.

नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचणाऱ्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिसला गुप्तचर संस्थांनी त्यांच्याच ‘शस्त्रा’ने मात दिली. इंटरनेटद्वारे युवांची भरती करणाऱ्या या अतिरेकी संघटनेचे नेटवर्क उद््ध्वस्त करण्यासाठी गुप्तचर व सुरक्षा संस्थांनीही इंटरनेटचाच वापर केला. इसिसच्या या नेटवर्कमध्ये सामील अतिरेक्यांची ओळख गतवर्षीच पटली होती. तेव्हापासून गुप्तचर व सुरक्षा संस्था त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून होत्या.गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणमध्ये पसरलेले हे अतिरेकी आधीच गुप्तचर संस्थांच्या रडारवर होते. मात्र गत सहा महिन्यांपासून या अतिरेक्यांच्या आॅनलाइन व आॅफलाइन हालचालींवर नजर ठेवली जात होती. मंत्रालयाने गतवर्षी मध्यास एक गुप्त पाहणी केली होती. त्यात धक्कादायक तथ्य समोर आले होते. महाराष्ट्राच्या मुंबई व चिंचवडसह पाच शहरांच्या युवांवर इसिसचा प्रभाव अधिक असल्याचे या पाहणीतून ठळकपणे समोर आले होते. हे युवा इंटरनेटवरून इसिसबाबत माहिती मिळवत होते. श्रीनगरमध्ये सर्वाधिक लोक इसिसच्या प्रभावाखाली आहेत तर उत्तर प्रदेशातील सर्वाधिक शहरांमध्ये इंटरनेटवरून इसिसबाबत माहिती गोळा केली जात आहे. इसिसच्या प्रभावाखाली १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांचा भरणा असल्याचेही या पाहणीतून समोर आले होते. या शेकडो लोकांपैकी संशयितांची ओळख पटवणे हे सुरक्षा संस्थांपुढचे मोठे आव्हान होते. ही माहिती संबंधित राज्यांना दिली गेली. पोलीस व अन्य दुसऱ्या माध्यमातून या संशयितांच्या आॅफलाईन हालचालींवर नजर ठेवली जात होती. याशिवाय सायबर तज्ज्ञांची एक टीम त्यांच्या आॅनलाइन हालचालीही टिपत होती. यासाठी अमेरिकन संस्थांचीही मदत घेतली गेली. या संशयितांनी हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्याची तयारी सुरू केली, काहींनी आयईडी बनवण्याची सामग्री गोळ करण्याचे प्रयत्न केले. याचदरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने या संशयितांना जेरबंद केले.इसिसचा कट हाणून पाडण्यासाठी रचण्यात आलेल्या या अभियानाच्या दर मिनिटाची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दिली जात होती. गुप्तचर व सुरक्षा दलांना कुठलीही हलगर्जी न बाळण्याचे आणि त्वरित कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. अतिरेकी हल्ल्याचे संकेत मिळताच अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.धोका कायम इसिसच्या एका मोठ्या नेटवर्कला ध्वस्त करण्यात भारतीय सुरक्षा संस्थांना यश आले असले तरी धोका अद्यापही टळलेला नाही. त्याचमुळे रॉ,आयबी, एनएसजी, दिल्ली एनआयए, बीएसएफ, पोलीस, सीआयएसएफ, आयटीबीपी, सीआरपीएफ आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेत तैनात सर्व सुरक्षा दलांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.