शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इशरतप्रकरणी ‘बनावट विवाद’!

By admin | Updated: June 17, 2016 02:55 IST

इशरत जहाँप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांवरून मोदी सरकार ‘बनावट विवाद’ निर्माण करीत आहे आणि गहाळ झालेल्या फाइल्सवर ‘खाडाखोड’ करून अहवाल तयार केला जात

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांवरून मोदी सरकार ‘बनावट विवाद’ निर्माण करीत आहे आणि गहाळ झालेल्या फाइल्सवर ‘खाडाखोड’ करून अहवाल तयार केला जात आहे, असा स्पष्ट आरोप काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.इशरत जहाँ प्रकरणाशी संबंधित गहाळ झालेल्या फायलींचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती या प्रकरणातील साक्षीदाराला शिकवणी देत असल्याचे वृत्त, एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाल्यानंतर चिदंबरम यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून वरील आरोप केला. ‘इशरतप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञांपत्रावरून मोदी सरकारने निर्माण केलेल्या ‘बनावट विवादा’चे व्यापक स्वरूप या दैनिकातील बातमीमुळे उघड झाले आहे. खाडाखोड करून तयार करण्यात आलेला तपास अधिकाऱ्याचा अहवालदेखील सत्य लपवू शकत नाही, असा बोध यावरून घेता येईल,’ असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.‘इशरत जहाँ व अन्य तीन जण खरोखरच चकमकीत मारले गेले होते की त्यांना बनावट चकमकीत मारण्यात आले होते, हा खरा मुद्दा आहे. या प्रकरणी जुलै २०१३ पासून प्रलंबित असलेल्या सुनावणीतूनच सत्य समोर येईल,’ असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)दोन्ही प्रतिज्ञापत्रांबाबत मी घेतलेली भूमिका योग्य आहे, हेच या बातमीवरून स्पष्ट होते. पहिल्या प्रतिज्ञापत्रात (६ आॅगस्ट २००९) केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या गुप्तचर माहितीचा उल्लेख केला होता. इशरत जहाँ आणि अन्य तिघे जण बनावट चकमकीतच मारले गेले होते, असे न्या. एस. पी. तमांग यांनी अहवालात (७ सप्टेंबर २००९) म्हटले होते. त्यांच्या या अहवालामुळे गुजरात व अन्य ठिकाणी मोठे वादळ निर्माण झाले होते. - पी. चिदंबरम, माजी केंद्रीयमंत्री