शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पोलीस स्टेशनसमोर दगडफेक तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला : ६० जणांवर दंगलीचा गुन्हा; २० जण ताब्यात

By admin | Updated: February 22, 2016 02:15 IST

जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशयावरुन २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता.

जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशयावरुन २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री साडे आठ वाजता रणजित चव्हाण हा तरुण शनी पेठ पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर मित्रांसोबत उभा असताना तेथे दहा ते बारा जणांनी येवून त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात जबर मार लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याचा रुग्णालयात जबाब घेवून गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरु करताच दोन्ही कडील लोक पोलीस स्टेशनला जमले व बाहेर शिवीगाळ करायला सुरुवात केली.

लाईट फोडून केला दगडाचा मारा
रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जमा झाल्यानंतर त्यातील काही जणांनी हल्ला करण्याच्या उद्देशाने परिसरातील विद्युत खांबावर दगड मारुन दिवे फोडले. पोलीस स्टेशनलाच लागून असलेल्या विद्युत डी.पी.वरही दगडफेक करुन वीज पुरवठा बंद करण्यात आला.त्यानंतर दगड व विटांचा मारा सुरु झाला. यात काचेच्या बाटल्या तसेच ट्युब लाईटचा वापर करण्यात आला. याप्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
धरपकड
दोन्ही बाजूंनी दीडशे ते दोनशे जणांचा जमाव एकमेकावर हल्ला करत असल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व नियंत्रण कक्षातून तातडीने जास्तीचा बंदोबस्त मागवून घेतला. यावेळी हल्लेखोरांना घरातून काढून ताब्यात घेण्याचे आदेश ठाकूर यांनी दिल्याने पोलिसांनी धरपकड सुरु केली. यात रात्री उशिरापर्यंत वीस जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

यांना घेतले ताब्यात
संशयावरुन हेमंत गोयल, लखन, अल्फाईज, अमिन, आकाश,अनीस शेख, जाकीर, मोहम्मद खाटीक व आसीफ शहा यांच्यासह २० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंदकुमार ठाकूर हे स्वत: रात्री त्यांची उशिरापर्यंत चौकशी करत होते.