शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजगिरा चिक्कीत लोखंडाचा तुकडा

By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST

फोटो : ०३एएमपीएच३४

फोटो : ०३एएमपीएच३४
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
राजगिरा चिक्कीत लोखंडाचा तुकडा
संतोष शेंडे/टाकरखेडा संभू (अमरावती) : शासनामार्फत राज्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात येणार्‍या राजगिर्‍याच्या चिक्कीत लोखंडाचा तुकडा आढळून आला. ही संतापजनक घटना भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे शुक्रवारी उघडकीस आली.
टाकरखेडा संभू येथे एकूण चार अंगणवाड्या आहेत. त्यापैकी अंगणवाडी क्र.४ मध्ये शासनाकडून पुरविण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात चिक्कीचे पोते आले होते. एका पोत्यात १२९ नगाप्रमाणे ५७६ नग चिक्की होती. या चिक्कीचे वाटप करण्यासाठी अंगणवाडीत सरपंच चंद्रशेखर गेडाम, सदस्य शरद मोहोड ही मंडळीसुध्दा दाखल झाली होती. चिक्कीचा एक तुकडा काढताच त्यात लोखंडाचा तुकडा आढळून आला. याची माहिती सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी राजेंद्र दाळू, बालविकास प्रकल्पाच्या अर्चना काळे, आरोग्य सहकारी गुल्हाने, तालुका आरोग्य अधिकारी सिरसाट, बालविकास अधिकारी धारगे यांना देण्यात आली. लगेच सर्व अधिकारी टाकरखेडा संभू येथील अंगणवाडी केंद्रात दाखल झाले. बालकांसाठी पाठविलेल्या शालेय पोषण आहारात लोखंडाचा तुकडा निघाल्याने पालक संतप्त झाले आहेत.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
कोट
शासनामार्फत पुरविण्यात आलेल्या राजगिर्‍याच्या चिक्कीत पीन आढळून आली. पोषण आहाराचे वाटप सुुरू असताना सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिलांचीही यावेळी उपस्थिती होती. पीन दिसताक्षणी लाभार्थ्यांना चिक्कीचे वाटप बंद करण्यात आले असून सर्व मालाला सील लावण्यात आले.
- कैलास घोडके, महिला व बालकल्याण अधिकारी, अमरावती.