आयर्लंड विजयी
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
रोमहर्षक लढतीत आयर्लंड विजयी
आयर्लंड विजयी
रोमहर्षक लढतीत आयर्लंड विजयीझिम्बाब्वेवर पाच धावांनी मातहोबर्ट : आयर्लंडने रोमहर्षक लढतीत शनिवारी झिम्बाब्वेला अवघ्या पाच धावांनी पराभूत करीत विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलच्या चढाओढीत स्वत:ला कायम राखले.आयर्लंडने प्रथम फलंदाजी करीत विश्वचषकातील सवार्ेच्च ८ बाद ३३१ धावांची नोंद केली. एड जॉयसने ११२ आणि ॲण्डी बालबर्नी याने ९७ धावांचे योगदान दिले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. झिम्बाब्वेकडून कर्णधार ब्रँडन टेलर याने १२१ तसेच सीन विलियम्सने ९६ धावा ठोकल्या. पण पाच धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे विजयापासून वंचित राहिला. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज ॲलेक्स कुसाक याने अखेरच्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर दोन गडी बाद करीत झिम्बाब्वेला स्पर्धेबाहेर केले. आयर्लंडने चार सामन्यात तीन विजय आणि एका पराभवासह चौथे स्थान पटकावले. झिम्बाब्वेची एकवेळ ४ बाद ७४ अशी अवस्था झाली होती पण टेलर- विलियम्स यांनी पाचव्या गड्यासाठी १४९ धावा ठोकून सामन्यात चुरस आणली. टेलरला कुसाकने ३८ व्या षटकांत बाद केल्यानंतरही विलियम्सने एकाकी झुंज दिली. तो ४७ व्या षटकांत अखेरच्या चेंडूवर केविन ओब्रायनचा बळी ठरला. रेजिस चाकब्वा १७ आणि तवांडा मुपरिवा १८ यांनी आशा पल्लवित केल्या त्यावेळी अखेरच्या षटकांत सात धावांची गरज होती. कुसाकने पहिल्या चेंडूवर चाकब्वाची दांडी गुल केली. मुपरिवाचा झेल कर्णधार विलियम्स पोर्टरफिल्डने टिपताच झिम्बाब्वेची आशा संपली.त्याआधी जॉयसच्या शतकामुळे आयर्लंडने सर्वाधिक धावा उभारल्या. बालबर्नी कर्णधार ब्रँडन टेलरच्या फेकीवर झेलबाद होताच शतकापासून वंचित राहिला. या संघाची सुरुवातही खराब झाली होती. पोर्टरफिल्ड २९, पॉल स्टर्लिंग १० हे लवकर बाद झाले. जॉयस - बालबर्नी यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३८ धावा उभारून धावसंख्येला आकार दिला. जॉयसने १०३ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकार खेचले. बालबर्नीने ७८ चेंडू टोलवित सात चौकार आणि चार षटकार मारले. गॅरी विल्सनने १३ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २५ धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)