आयपीएस अधिकारी संजीव भट बडतर्फ गोधरा कांड : मोदी सरकारवर केली होती टीका
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
अहमदाबाद : आयपीएस अधिकारी संजीव भट यांचा सेवेतून बडतर्फीचा आदेश गुजरातचे उपसचिव जी.सी. यादव यांनी काढला आहे. २००२ मधील गोधरा दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्यामुळे भट प्रसिद्धीझोतात आले होते.
आयपीएस अधिकारी संजीव भट बडतर्फ गोधरा कांड : मोदी सरकारवर केली होती टीका
अहमदाबाद : आयपीएस अधिकारी संजीव भट यांचा सेवेतून बडतर्फीचा आदेश गुजरातचे उपसचिव जी.सी. यादव यांनी काढला आहे. २००२ मधील गोधरा दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्यामुळे भट प्रसिद्धीझोतात आले होते.भट यांच्याविरुद्ध करण्यात आलेले सर्व ११ आरोप सत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक संधी देऊनही भट यांना निरपराधित्व सिद्ध करता आलेले नाही, असे यादव यांनी आदेशात म्हटले. मोदी सरकारवर टीका केल्यानंतर २०११ पासून आतापर्यंत भट निलंबितच होते. मी २७ वर्षे पोलीस सेवेत घालविल्यानंतर अखेर मला काढून टाकण्यात आले आहे. पुन्हा मी नोकरीसाठी पात्र आहे, कुणी देणार का नोकरी, असे टिष्ट्वट करीत भट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) ---------------------------------हकालपट्टीनंतर नोटीस सेक्स व्हिडिओसंबंधी तक्रार आल्यानंतर गृह मंत्रालयाने त्यांना अलीकडेच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोकरीवरून काढणे आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या कालावधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच भट म्हणाले की, नोकरीतून हकालपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामागे माझी प्रतिमा मलीन करण्याचाच हेतू आहे. सरकारला मी नोकरीवर नको आहे. सरकारच्या निर्णयाला मी आव्हान देणार नाही.