शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन 7च्या बॅटरीचा स्फोट, आग लागून कारचे नुकसान

By admin | Updated: October 22, 2016 14:45 IST

सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणे आता अॅपलच्या आयफोन ७ ला ही आग लागल्याचे एक प्रकरण समोर आले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सिडनी, दि. २२ - सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणे आता अॅपलच्या आयफोन ७ ला ही आग लागल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्समध्ये ही घटना घडली.  मॅट जोन्स यांनी आयफोन ७ च्या स्फोटामुळे आपल्या गाडीला आग लागल्याचा दावा केला आहे.
' 7 News'ने दिलेल्या वृत्तानुसार मॅट जोन्स त्यांची गाडी न्यू साऊथ वेल्सच्या रस्त्यावर पार्क करुन फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. बाहेर निघताना त्यांनी आयफोन ७ एका कपडयामध्ये गुंडाळून ठेवला होता. जेव्हा ते फिरुन आले तेव्हा त्यांना गाडीमधून धूर येताना दिसला. कपडयामध्ये गुंडाळलेला आयफोन ७ जळत होता. आयफोन ७ मुळे आग लागून आपल्या गाडीच्या इंटीरीयरचे नुकसान झाल्याचा त्यांचा आरोप आहे. 
 
आणखी वाचा 
आयफोन ७ घेताय ? मग जाणून घ्या हे तोटे
 
ज्या कापडात आयफोन ७ ठेवला होता ते कापड उघडले असता आत ठेवलेला फोन पूर्णपणे वितळल्याचे दिसून आले, असे जोन्स यांनी ७ न्यूजशी बोलताना सांगितले. अॅपलच्या या बहुचर्चित फोनबद्दल यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. अॅपलला या घटनांची पूर्ण माहिती असून, अशा प्रकारे अचानक फोन पेट घेण्याच्या घटना कशामुळे घडत आहेत त्याचा अॅपल तपास करत आहे. 
 
आयफोनला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही आयफोन ७ प्लसचा स्फोट झाल्याचे वृत्त होते. याआधी सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट ७ या स्मार्टफोनलाही खराब बॅटरीमुळे आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इतकी महागडी वस्तू घेऊनही सुरक्षा मिळत नसेल तर काय उपयोग असा युझरचा सवाल आहे.