शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ँपान १-महाराष्ट्र सदन- संपत्तीवर टाच

By admin | Updated: September 2, 2015 23:32 IST

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातचमणकर यांच्या संपत्तीवर टाचमुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील चमणकर एंटरप्रायजेसच्या १७.३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात फार्महाऊस, पाच फ्लॅट आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या या घोटाळ्याच्या संदर्भात संपत्तीवर टाच आणण्याची ही पहिली कारवाई ...


महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात
चमणकर यांच्या संपत्तीवर टाच
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील चमणकर एंटरप्रायजेसच्या १७.३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात फार्महाऊस, पाच फ्लॅट आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या या घोटाळ्याच्या संदर्भात संपत्तीवर टाच आणण्याची ही पहिली कारवाई आहे.
अंमलबजावणी संचानालयाने मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायद्याखाली भुजबळांविरुद्ध दोन प्राथमिक तक्रार अहवाल नोंदविले आहेत. पहिले प्रकरण महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित असून दुसरे प्रकरण नवी मुंबईतील हाऊसिंग प्रोजेक्टशी संबंधित आहे.
महाकृष्णा, प्रणिता आणि प्रसन्न चमणकर यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची ही या घोटाळ्याशी सबंधित पहिलीच कारवाई होय. प्राथमिक तक्रार अहवालात या तिघांची नावे नमूद करण्यात आलेली होती. चमणकर इंटरप्रायजेसने ओरिजन इन्फ्रास्ट्रक्चर या डमी कंपनीच्या खात्यात ७ डिसेंबर २००७ आणि ९ मे २०११ दरम्यान ३,६७,७१,६०१ रुपये जमा कले होते. मागच्या महिन्यात अंमलबजावणी संचानालायने राजेश मिस्त्रीच्या विलेपार्लेतील प्रभु कुटिरमधील फ्लॅटवर धाड टाकली होती. छगन भुजबळ यांना लाच देण्याची जबाबदारी चमणकर यांनी काही लोकांवर टाकली होती. त्यापैकी राजेश मिस्त्री एक आहे. पंकज आणि समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपनीच्या खात्यात (निश इन्फ्रास्ट्रक्चर) मिस्त्रीने ४.५ कोटी रुपये जमा केले होते.
मिस्त्री हा एक व्यावसायिक असून उज्ज्वल काकरियाचा ग्राहक आहे. उज्ज्वलचे बंधू विपुल हे सुभाष कोटडिया यांच्या रॉयल इंटरप्रायजेसमध्ये भागीदार आहेत. भुजबळ यांना लाच देण्यासाठी प्राईम डेव्हलपर्सने याच कंपनीचा वापर केला. प्राइम डेव्हलपर्सने अंधेरीतील आरटीओ विभागाची जमीन विकसित करण्यासाठी चमणकर एंटरप्रायजेसकडून कंत्राट मिळविले होते.