शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दहा राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण

By admin | Updated: July 9, 2017 00:28 IST

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी आसिआन संघटनेच्या १0 सदस्य देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्याचे भारताने ठरविले आहे. अ‍ॅक्ट ईस्ट धोरणानुसार

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी आसिआन संघटनेच्या १0 सदस्य देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्याचे भारताने ठरविले आहे. अ‍ॅक्ट ईस्ट धोरणानुसार भारताने पूर्व आशियातील देशांशी दोस्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रजासत्ताक दिनासाठी इतक्या मोठ्या संख्येने पाहुणे बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत प्रजासत्ताक दिनासाठी एका राष्ट्राच्या प्रमुखाला आमंत्रण दिले जाते. आसिआनमध्ये ब्रुनेई, काम्पुचिया (कंबोडिया), मलेशिया, इंडोनेशिया, लाओस, म्यानामार, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम हे देश सदस्य आहेत. चीन करत असलेल्या घुसखोरीमुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने या दहा राष्ट्रांच्या प्रमुखांना एकाच वेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देणे महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी सरकारने केवळ लूक ईस्ट नव्हे, तर अ‍ॅक्ट ईस्ट धोरण जाहीर केले होते. पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांशी असलेले संबंध वृद्धिंगत करणे हा त्याचा उद्देश आहे. भारत आणि आसिआन यांच्यातील संबंधांना यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतात विविध परिषदा आणि कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येत आहे. भारत व आसिआन यांच्यात १९९२ साली संबंध प्रस्थापित झाले आणि १९९६ साली भारताला फुल डायलॉग पार्टनर असा दर्जा देण्यात आला. त्यानंतर भारत आसिआनच्या देशांशी आसिआन रिजनल फोरम, ईस्ट एशिया समिट, आसिआन डिफेन्स मिनिस्टर मीटिंग प्लस, एक्सपांडेड आसिआन मेरिटाइम फोरम अशा विविध समित्या, परिषदांमध्ये सहभागी होत आला आहे. एक तृतीयांश लोकसंख्यालोकसंख्येचा विचार करता, भारत आणि आसिआन यांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे. भारत आणि आसिआन देशांमधील रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अ‍ॅग्रिमेंट हा करार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरसीईपी हा मुक्त व्यापाराचा करार आहे. भारत-म्यानमार-थायलंड असा तीन देशांमधून तयार होणारा महामार्ग कंबोडियापर्यंत वाढवण्याचाही विचार सुरू आहे.