शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कलबुर्गींच्या हत्येचा महाराष्ट्रातही तपास

By admin | Updated: September 2, 2015 09:16 IST

प्रख्यात कन्नड पुरोगामी विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग देताना कर्नाटक पोलिसांनी चार तपास पथकांकडे जबाबदारी सोपविली आहे

बंगळुरू : प्रख्यात कन्नड पुरोगामी विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग देताना कर्नाटक पोलिसांनी चार तपास पथकांकडे जबाबदारी सोपविली आहे. कलबुर्गी यांची रविवारी धारवाड येथे अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केल्यानंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.कर्नाटकच्या अन्य भागातही तपास चमू पाठविले जातील. याशिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे काय याची गांभीर्याने शहानिशा केली जाणार असल्याची माहिती हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त पी. एच. राणे यांनी दिली. रोखठोक विधाने करीत पुरोगामी विचार मांडत ७७ वर्षीय कलबुर्गी यांनी कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांची हत्याही गोळ्या झाडून झाल्याने त्यातील साम्य हा तपासाचा विषय ठरू शकतो. या तिघांच्या हत्याकांडाचा परस्परांशी संबंध तपासला जाणार काय, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला होता. अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणाऱ्या डॉ. दाभोलकर यांची पुण्यात २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. टोलविरोधात आंदोलन पुकारणाऱ्या पानसरे यांच्यावर यावर्षी १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. (वृत्तसंस्था)