शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सैैनिकांवर येणार स्वखर्चाने गणवेश खरेदी करण्याची पाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:22 IST

दारूगोळा व इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी केंद्राने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्कराने दारूगोळा कारखान्यांमधून होणाऱ्या खरेदीला मोठी कात्री लावली आहे. त्याचा फटका सैैनिकांना देण्यात येणारे गणवेश, बुटांचे जोड, टोपी, कमरपट्टा आदी गोष्टींच्या पुरवठ्यावरही होणार आहे.

नवी दिल्ली : दारूगोळा व इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी केंद्राने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्कराने दारूगोळा कारखान्यांमधून होणाऱ्या खरेदीला मोठी कात्री लावली आहे. त्याचा फटका सैैनिकांना देण्यात येणारे गणवेश, बुटांचे जोड, टोपी, कमरपट्टा आदी गोष्टींच्या पुरवठ्यावरही होणार आहे. त्यामुळे सैैनिकांवर पुढील काळात कदाचित स्वत:च्या पैैशाने गणवेश खरेदी करायचीही पाळी येऊ शकेल.दहा दिवस चालणाºया अल्पमुदतीच्या युद्धासाठी आवश्यक असलेला दारूगोळा व संरक्षणविषयक अन्य सामुग्री यांचा पुरेसा साठा करण्यासाठी लष्कराने तीन योजना आखल्या आहेत. त्याकरिता हजारो कोटी रुपयांची गरज आहे. मात्र या योजनांसाठी केंद्र सरकार अतिरिक्त निधी द्यायला तयार नसल्याने लष्कराला आता विविध गोष्टींना कात्री लावून हे पैैसे उभारावे लागत आहेत. केंद्र सरकारने २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खर्चासाठी केलेली तरतूदही पुरेशी नाही.लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीची गरज लक्षात घेऊन दारूगोळा व संरक्षणविषयक सामग्रीचा साठा करण्यावर लष्कराने याआधीच ५ हजार कोटी रुपये खर्च केले असून, यंदा आणखी ६७३९.८३ कोटी रुपयांची गरज आहे. या योजनांसाठी २१,७३९.८३ कोटी रुपये इतका एकूण खर्च येणार असून, केंद्राकडून त्यासाठी काहीही मदत मिळणार नाही. त्यामुळे दारूगोळा कारखान्यांकडून करण्यात येणाºया खरेदीत मार्चपासून ५० टक्के कपात करण्यात आली. त्याद्वारे दरवर्षी ३ हजार ५०० कोटी रुपये वाचविण्यात येतील व त्यामध्ये लष्कर स्वत:च्या पदरच्या चार हजार कोटी रुपयांची भर घालेल. अशा प्रकारे तीन वर्षात २४ हजार कोटी रुपयांची रक्कम या योजनांसाठी उभी केली जाईल.दारूगोळा बनविणार भारतीय कंपन्याउरी येथे २०१६ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने आपल्याकडील दारुगोळा व शस्त्रसामुग्रीचा आढावा घेतला. दहा दिवसांच्या अल्पमुदतीच्या युद्धासाठी ४६ प्रकारचा दारूगोळा, रणगाडे, लष्करी वाहनांचे सुटे भाग यांचा पुरेसा साठा करणे आवश्यक असल्याचे या आढाव्यातून दिसून आले. आता आठ प्रकारचा दारूगोळा भारतीय कंपन्यांकडूनच बनवून घेण्याची दहा वर्षे मुदतीची योजना केंद्राने आखली असून त्यावर दरवर्षी १७०० कोटी रुपये खर्च केले जातील.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान