शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोराचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:07 IST

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेवर एका पाकिस्तानी घुसखोराचा मृतदेह भारतीय जवानांना आढळला. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा असल्याचेही दिसून आले.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेवर एका पाकिस्तानी घुसखोराचा मृतदेह भारतीय जवानांना आढळला. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा असल्याचेही दिसून आले. भारतीय जवानांनी रविवारी सायंकाळी त्या ठिकाणी भारतात घुसखोरी करण्याच्या अतिरेक्यांच्या डाव उधळून लावला होता.पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचे (बॅट) सैनिक एकीकडे भारताच्या दिशेने गोळीबार करीत असताना, दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते. मात्र भारतीय जवानांनी बॅटच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि घुसखोरीही होऊ दिली नाही. त्यावेळी हा घुसखोर ठार झाला असावा, असा अंदाज आहे. त्या कारवाईत भारताचे तीन जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या परिसरात लष्कराकडून स्फोटकांचा शोध घेऊन निकामी करण्याचे काम सुरू होते. यावेळी हा मृत अवस्थेतील घुसखोर आढळल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)बडगामच्या हवाई दलाच्या स्टेशनमध्ये घुसू पाहणाºया एका इसमाला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. तो आत घुसण्याचा प्रयत्न केला असता, जवानांनी त्याला वारंवार आत न येण्याच्या सूचना दिल्या. तरीही तो आत येत होता. त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. मात्र तो दहशतवादी नसून, मनोरुग्ण होता, असे नंतर तपासणीत उघड झाले.दीड महिन्यात ११ जवान ठारचालू वर्षात आतापर्यंत पाकच्या हल्ल्यामुळे भारताचे ११ सुरक्षा जवान शहीद झाले आहेत तर ९ नागरिक मरण पावले आहेत. नियंत्रण रेषेलगत कारवायांमध्ये ७५ जण जखमी झाले. रविवारी मनकोट सब सेक्टरमध्ये एक कनिष्ठ श्रेणीतील सैन्य अधिकारी भूसुरुंगावर पाय पडल्याने झालेल्या स्फोटात जखमी झाल्याचे कळवण्यात आले आहे.