लेवा पाटीदार समाजातर्फे परिचय मेळावा
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
लेवा पाटीदार युवक संघातर्फे परिचय मेळावा
लेवा पाटीदार समाजातर्फे परिचय मेळावा
लेवा पाटीदार युवक संघातर्फे परिचय मेळावाजळगाव - भोरगाव लेवा पंचायत व अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या संयुक्तविद्यमाने लेवा पाटीदार समाजातील शेतकरी, घटस्फोटित, विधवा, विधुर, अपंग, पौढ यांचे परिचय संमेलन १५ मे रोजी संतोषीमाता बहुउद्देशीय हॉल येथे होणार आहे. या निमित्त परिचय सूचीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. समाजातील इच्छुकांनी ओम इलेक्ट्रीकल, देशपांडे कॉप्लेक्स, जळगाव, डॉ. बाळू पाटील, पुरुषोत्तम नगर भुसावळ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सायकल रॅलीसउत्स्फूर्त सहभागजळगाव - शिवाजी कमांडो संस्थेतर्फे पर्यावरण संतुलन, बेटी-बचाव, बेटी पढाव, पाणी वाचवा असा संदेश देत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीस महापालिका स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे यांनी हिरवी झेंडी दाखविली. काव्यरत्नावली चौकातून रॅलीन प्रारंभ झाला. प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी केले. प्रा. समीर घोडेस्वार, भाग्यश्री कुलकर्णी, वैशाली भारंबे, राहुल पाटील, योगिता झंवर, अश्विनी पाटील, शीतल तिवारी, शुभदा पटवारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. भगीरथ शाळेत इंग्रजी भाषा सराव शिबिरजळगाव - विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढावे या उद्देशाने भगीरथ शाळेतर्फे इंग्रजी भाषा सराव प्रशिक्षणाचे आवाहन करण्यात आले. शाळेतील शिक्षक किरण पाटील, किशोर पाटील यांनी सरावाबद्दल मार्गदर्शन केले. गौरव जाधव, राहुल पाटील, अश्विनी कोयलकर, पूजा सदाफुले, जयश्री खंबायत यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपमुख्यध्यापिका नेहा जोशी, पर्यवेक्षक किशोर राजे, कलाशिक्षक एस.डी. भिरूड यांनी सहभागी विद्यार्थ्यांंचे कौतुक केले. श्रीनाथ विद्यामंथनयोग शिबिर १ मे पासूनजळगाव - श्रीनाथजी विद्यामंथन योग शिबिर येत्या १ ते ३१ मे दरम्यान आयोजिण्यात आले आहे. भक्ती, ज्ञान, विरता अशा विविध विषयांवर यात मार्गदर्शन केले जाईल. तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश असेल. दो सत्रात हे शिबिर होणार असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.