नवी दिल्ली : तुमच्या स्मार्टफोनच्या इंटरनेटची स्पीड काय आहे? अर्थात, याबाबत तुम्ही ठोस उत्तर देऊ शकत नाही. कारण, अनेकदा ३-जी पॅकमध्येही अपेक्षित गती इंटरनेटवर मिळत नाही. इंटरनेटची ही स्पीड अचूक सांगणारे ‘माय स्पीड’ हे अॅप ‘ट्राय’ने दाखल केले आहे. या माध्यमातून आपल्या इंटरनेटची स्पीड कळण्यास मदत होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (ट्राय) याबाबत स्पष्ट केले आहे की, अॅण्ड्रॉईड फोनच्या माध्यमातून इंटरनेटची ही स्पीड समजून घेता येईल.>‘ट्राय माय स्पीड’ हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे लागेल. ग्राहकांना इंटरनेटशी वा अन्य काही तक्रारी असतील, तर याच माध्यमातून ग्राहक आपल्या तक्रारीही नोंदवू शकेल.
इंटरनेट स्पीड मोजणारे अॅप
By admin | Updated: July 4, 2016 04:04 IST