नैसर्गिक औषधोपचार पद्धती व वनौषधी संशोधनावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी विज्ञानशास्त्र विभागातर्फे नैसर्गिक औषधोपचार पद्धती व वनौषधी-संशोधनावर जागतिक विश्लेषण या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पाच वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, दोन कार्यशाळा नागपूर विद्यापीठाच्या औषध विज्ञानशास्त्र विभागामध्ये, दोन कार्यशाळा गुरुनानक औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, नारी व पंचकर्मावरील कार्यशाळा बैद्यनाथ पंचकर्म, हिस्लॉप महाविद्यालयाजवळ, सिव्हिल लाईन येथे आयोजित केली आहे. परिसंवादाचे उद्घाटन २० फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त व माजी केंद्रीय मंत्री चंद्रेश्वर ठाकू र यांच्या उपस्थितीत होणार आहेत. २१ व २१ फेब्रुवारीचे कार्यक्रम चिटणवीस
नैसर्गिक औषधोपचार पद्धती व वनौषधी संशोधनावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी विज्ञानशास्त्र विभागातर्फे नैसर्गिक औषधोपचार पद्धती व वनौषधी-संशोधनावर जागतिक विश्लेषण या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पाच वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, दोन कार्यशाळा नागपूर विद्यापीठाच्या औषध विज्ञानशास्त्र विभागामध्ये, दोन कार्यशाळा गुरुनानक औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, नारी व पंचकर्मावरील कार्यशाळा बैद्यनाथ पंचकर्म, हिस्लॉप महाविद्यालयाजवळ, सिव्हिल लाईन येथे आयोजित केली आहे. परिसंवादाचे उद्घाटन २० फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त व माजी केंद्रीय मंत्री चंद्रेश्वर ठाकू र यांच्या उपस्थितीत होणार आहेत. २१ व २१ फेब्रुवारीचे कार्यक्रम चिटणवीस सेंटर येथे होणार आहेत. परिसंवादाचे मुख्य संरक्षक कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रा. रघुनाथ माशेलकर आहेत. विजय भटकर मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. या परिषदेचा मुख्य उद्देश पारंपरिक उपचार पद्धती आणि त्यात उपयोगात येणारे औषधी वनस्पती यांचा प्रसार, ज्ञान आणि संशोधन व्हावे, असा आहे.