शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपात दिग्गज इच्छुक

By admin | Updated: February 20, 2017 01:14 IST

जुलै-आॅगस्टमध्ये होत असलेल्या उप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, हुकूमदेव

व्यंकटेश केसरी / नवी दिल्ली जुलै-आॅगस्टमध्ये होत असलेल्या उप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, हुकूमदेव नारायण यादव व लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभेत भाजपचे २८२ सदस्य आहेत. तर, राज्यसभेत ५६ सदस्य आहेत. आपले सहकारी पक्ष आणि जे पक्ष काँंग्रेससोबत जाऊ इच्छित नाहीत त्या पक्षांना भाजप सोबत घेऊ शकते. अर्थात, काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते सद्या या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सदर प्रतिनिधीशी बोलताना या नेत्यांनी सांगितले की, सुमित्रा महाजन उप राष्ट्रपती होण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. कारण, अण्णाद्रमुक, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस यासारख्या पक्षांवर भाजप अवलंबून आहे. तामिळनाडूतील द्रमुक, जम्मू काश्मीरमधील पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांसारख्या पक्षांची आपआपल्या राज्यात चांगली ताकद आहे. उप राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असलेले भाजपचे एक ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू हे राजस्थानातून राज्यसभा सदस्य आहेत. नायडू हे गुुरु एल. के. अडवाणी यांना सोडून आता नरेंद्र मोदी यांच्या गटात दाखल झालेले आहेत. मोदींची पसंती कुणाला?पंतप्रधान मोदी यांची पसंती मात्र बिहारच्या मधुबनी मतदारसंघातील खासदार हुकूमदेव नारायण यादव यांना आहे. यादव यांनी १९७७ मध्ये जनता पार्टीकडून प्रथम लोकसभेत प्रवेश मिळविला होता. लोकदलाच्या चिन्हावर नंतर ते संसदेत आले आणि त्यानंतर भाजपत स्थिर झाले. वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री होते. अर्थात यातील कोणत्या उमेदवाराला मोदी अंतिम पसंती देतील हे अस्पष्ट आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अतिशय छोटी असणार आहे. भैरवसिंह शेखावत हे भाजपचे पहिले उप राष्ट्रपती झाले होते.