जलसुरक्षेसाठी एकात्मिक नियोजन हवे उमा भारती : जैन इरिगेशनला भेट
By admin | Updated: January 8, 2016 23:20 IST
जळगाव- देशातील उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजनावर भर द्यायला हवा, असे मत केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी केले.
जलसुरक्षेसाठी एकात्मिक नियोजन हवे उमा भारती : जैन इरिगेशनला भेट
जळगाव- देशातील उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजनावर भर द्यायला हवा, असे मत केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी केले. उमा भारती यांनी शुक्रवारी शहराजवळील जैन हिल्स येेथे कृषि संशोधन केंद्र, फळप्रक्रिया प्रकल्प, टिश्यूकल्चर बायोलॅब, सोलर प्रकल्प, प्लास्टिक पार्क आदींना भेट देऊन माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासोबत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ, सहकारी उपस्थित होते. पाण्याच्या काटेकोर नियोजनासाठी उच्च तंत्रज्ञान उपयोगात येते. पाण्यासंबंधी एकात्मिक व्यवस्थापन करताना शिवारात लहान मोठ्या नाल्यांवर लहान बंधारे बांधणे, शेतीची बांधबंदीस्ती करणे आवश्यक आहे. हेच पाणी जमिनीत झिरपेल त्याचा काटेकोर वापर केल्यास निश्चित सकारात्मक चित्र निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या. बरड जमिनीचा उपयोग फलोत्पादनाच्या दृष्टिने अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा, असेही जैन हिल्सवर बरड जमिनीवर साकारलेल्या पेरू बागेची पाहणी त्यांनी केली. जैन हिल्सच्धर्तीवर संशोधन केंद्र देशाच्या कानाकोपर्यात विकसित व्हायला हवेत. देशातील बरड जमिनीचा वापर व्हावा. त्यासाठी मोठे काम करता येईल, असेही त्यांनी सांगितले.