शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांसाठी तत्काळ निधी द्या!

By admin | Updated: June 26, 2015 02:36 IST

गतिवर्धक सिंचन लाभ योजनेअंतर्गत (एआयबीपी) मंजूर करण्यात आलेल्या सहा सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारतर्फे मंजूर करण्यात

नवी दिल्ली : गतिवर्धक सिंचन लाभ योजनेअंतर्गत (एआयबीपी) मंजूर करण्यात आलेल्या सहा सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारतर्फे मंजूर करण्यात आलेला निधी तत्काळ जारी करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांना या मागणीचे पत्र सादर केले. महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यांच्यासाठी फारच कमी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमान १३ प्रकल्पांना वन आणि पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळायचा आहे, असे महाजन यांनी सांगितले.ते म्हणाले, केंद्रीय जल संसाधन मंत्र्यांनी २०१४-१५ मध्ये तरळी, धोम बालकावाडी, वाघूर, अपर पैनगंगा, लोअर दुधना आणि बेंबडा सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. या प्रकल्पांना केंद्राकडून एकूण ३१६.४६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार होते. परंतु मार्च २०१५ मध्ये केवळ ९.५० कोटी रुपये देण्यात आले. उर्वरित ३०६.९६ कोटी रुपये केंद्राकडून अद्याप मिळायचे आहेत. पुरेशा निधीअभावी हे प्रकल्प प्रभावित होत आहेत. त्यामुळे केंद्राने बाकीचा निधी लवकरात लवकर जारी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.राज्य सरकारने २०१४-१५ दरम्यान एआयबीपी अंतर्गत १९ मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडे एकूण १६२२ कोटी रुपयांची मदत मागितली होती. परंतु त्यापैकी केवळ सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे आणि उर्वरित १३ सिंचन प्रकल्प वन विभागाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. या प्रकल्पांत नागपूरचा कन्हान नदी सिंचन प्रकल्प, पेंच सिंचन प्रकल्प, अमरावतीचा भीमडी लघु सिंचन तलाव, वर्धा येथील बराज लिफ्ट सिंचन प्रकल्प आणि यवतमाळच्या खर्डा येथील प्रस्तावित लघु सिंचन तलाव प्रकल्पाचा समावेश आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली. (प्रतिनिधी)