शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आणखी उंच झेप घेण्याची प्रेरणा!

By admin | Updated: September 25, 2014 04:06 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मार्स आॅर्बिटर मिशन अर्थात मंगळयानाच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले़ ही उपलब्धी देशातील संशोधकांना आणखी उंच झेप घेण्याची प्रेरणा

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मार्स आॅर्बिटर मिशन अर्थात मंगळयानाच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले़ ही उपलब्धी देशातील संशोधकांना आणखी उंच झेप घेण्याची प्रेरणा देईल, असे ते म्हणाले़ राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या यशासाठी इस्रोचे अभिनंदन केले़इस्रोचे अध्यक्ष के़राधाकृष्णन यांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, मी मंगळ मोहिमेच्या यशासाठी आपल्याला व आपल्या चमूला शुभेच्छा देतो़ या यशानंतर मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा पहिला देश बनला आहे़ देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे़ आपल्या अंतराळ कार्यक्रमात ऐतिहासिक अशी ही उपलब्धी देशातील सर्व क्षेत्रातील संशोधकांना आणखी उंच झेप घेण्यासाठी प्रेरित करेल, असा मला विश्वास वाटतो़ आपले सर्व सहकारी शास्त्रज्ञ, अभियंत्रे, तंत्रज्ञ आणि या यशात वाटा असणाऱ्या सर्वांपर्यंत कृपया माझ्या या शुभेच्छा पोहोचवा़ या शुभेच्छा संदेशानंतर राष्ट्रपतींनी टिष्ट्वटरवरूनही इस्रोला शुभेच्छा दिल्या़ मंगळयानाच्या यशासाठी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदऩ देशाला या ऐतिहासिक उपलब्धीवर गर्व आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले़ उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी शास्त्रज्ञांची पाठ थोपटली़ संपूर्ण देश तुम्हाला सलाम करतो, असे ते म्हणाले़ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोला पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात आजची उपलब्धी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला़