शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

By admin | Updated: May 13, 2016 22:56 IST

रमेश बुंदिले : सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

रमेश बुंदिले : सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्नदेवळा : चार वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जनतेला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चालू वर्षीही अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात भीषण दुष्काळ पडला असून, यावर ठोस उपाययोजना होणेकामी मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तालुकावार गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेऊन शासनाकडे तसा अहवाल कळवावा, असा आदेश दिला आहे. या उद्देशाने अमरावती जिल्‘ातील दर्यापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार रमेश बुंदिले व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी देवळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी मेशी येथील पाणीटंचाईसंदर्भात अधिकार्‍यांना दुरुस्ती कामाची निविदा निघाली असून, तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गुरुवारी अवकाळी पावसाने खामखेडा परिसरात शेतकर्‍यांच्या डाळींबबागा, घरांची पडझड, शेडनेट, आदिंची नुकसान झाले. त्यांना भेटी देऊन शासनामार्फत उपाययोजना करता येईल यासाठी संबंधित अधिकार्‍यांकडून पंचनामे करून त्वरित अहवाल मागितला आहे. वाजगाव येथील पांडु कुवर यांचा तसेच वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसदारांना तत्काळ ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात येईल, असे बंुदिले यांनी सांगितले. बंुदिले त्यांच्यासोबत जि.प. कृषी सभापती केदा अहेर, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, शहराध्यक्ष किशोर अहेर, बापू देवरे, विजय अहेर, तहसीलदार कै लास पवार, गटविकास अधिकारी सी.एल. पवार, तालुका कृषी अधिकारी गुंजाळ, सहायक निबंधक एस.एस. गिते आदि दुष्काळी दौर्‍यात सहभागी झाले होते. यावेळी देवळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रमेश बुंदिले यांनी शेतकर्‍यांनी निराश न होता दुष्काळाचा सामना करावा, शासनाच्या सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस असून, आमचे पदाधिकारी आपणापर्यंत सर्व योजना पोहोचविण्याकामी सहकार्य करतील. त्यासाठी आपण कृषी विभाग, सहकार विभाग, पंचायत समिती, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभाग आदि कार्यालयांमध्ये जाऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. (वार्ताहर)चौकट :- देवळा तालुक्यातील विजयनगर, श्रीरामपूर, खुंटेवाडी ही गावे महसुली गावात येत नसल्याने दुष्काळासाठी शासनाच्या वीज वितरण कंपनीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते नितीन शेवाळकर यांनी आमदार बुंदिले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून या गावांचा समावेश करून त्यांना अनुदानाच्या लाभ देण्याच्या सूचना केल्या.