शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेत १0 लाख जमा करणाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: January 20, 2017 06:31 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमधे कोणी किती पैसे जमा केले याची प्राप्तिकर विभागाने छाननी सुरू केली

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमधे कोणी किती पैसे जमा केले याची प्राप्तिकर विभागाने छाननी सुरू केली आहे. या छाननीत दीड लाख खात्यांत १0 लाख वा त्याहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभाग १५ दिवसांत संशयास्पद जमा रकमांबाबत संबंधितांची आॅनलाइन विचारपूस सुरू करणार आहे.सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेसच्या सूत्रांनुसार ज्यांनी बँक खात्यांमधे १0 लाख अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे, अशा करदात्यांशी प्राप्तिकर विभाग नव्या ई प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क साधेल. आॅनलाइन चौकशीत या रकमा कोठून आल्या, याचा खातेदाराला खुलासा करावा लागेल. त्याने अधिकाऱ्याचे समाधान न झाल्यास रकमेविषयी सविस्तर माहिती खातेदाराला पुरवावी लागेल.सीबीडीटींची प्राप्तिकर अधिकाऱ्यांशी बुधवारी बैठक झाली, बँकांमध्ये जमा झालेल्या संशयास्पद रकमा, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे टार्गेट व नोटाबंदीनंतर सहकारी बँकांच्या शंकास्पद व्यवहारांबाबत माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांत प्राप्तिकर विभागाने झडत्या, धाडी व जप्तीची ११00 प्रकरणे नोंदवली आहेत. २ लाखांवरील व्यापारी व्यवहारांना पॅन क्रमांक देणे सक्तीचे आहे. ही मर्यादाही घटविण्याचा विचार केला जात आहे. याशिवाय रोख हाताळणी शुल्क लावण्याचाही सरकार विचार करीत आहे. जे मोठे व्यवहार रोखीने करतात, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत. आर्थिक व्यवहारासोबत आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यावरही सरकार विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.६१ कोटींची बक्षिसेरोखविरहित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने सुरू केलेल्या दोन पुरस्कार योजनांमध्ये गेल्या तीन आठवड्यांत देशभरातील ३.८१ लाख ग्राहक आणि २१ हजार व्यापाऱ्यांना एकूण ६०.९० कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत. ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत त्यांत घाटकोपर, मुंबई येथील अमित अनिल जाधव व नाशिक येथील मंगेश अनंतराव जाधव या तरुणांचा समावेश आहे. >३० हजारांपुढे पॅनसक्तीरोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार आणखी काही उपाययोजनांची घोषणा करण्याची शक्यता असून, ३0 हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच पॅन क्रमांक देण्याची सक्ती असलेल्या व्यवहारांची आर्थिक मर्यादा आणखी खाली येणार आहे.