शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाचा चाप ओढल्याने आई जखमी, शेतात सापडलेल्या शस्त्राचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 04:09 IST

सापडलेले पिस्तुल खेळण्यातील आहे, असे समजून आईने आपल्या मुलीला आणून दिले. मुलीनेही खेळणे म्हणून त्याचा चाप ओढला. पण पिस्तुलातून उडालेली गोळी आईला लागली आणि जखमी झाली. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोलकाता : सापडलेले पिस्तुल खेळण्यातील आहे, असे समजून आईने आपल्या मुलीला आणून दिले. मुलीनेही खेळणे म्हणून त्याचा चाप ओढला. पण पिस्तुलातून उडालेली गोळी आईला लागली आणि जखमी झाली. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ककोली नावाची महिला शेतात काम करीत असताना, तिला तिथे पिस्तुल पडल्याचे दिसले. ते खरे पिस्तुल असेल, असे तिला अजिबातच वाटले नाही. कोणा तरी लहान मुलाचे ते असेल आणि तो ते इथे विसरून गेला असेल, असा तिचा अंदाज होता. आपल्या मुलीला हे खेळणे नक्कीच आवडेल, म्हणून तिने ते मुलीला दिले. ते पाहून मुलगीही भलतीच खूश झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मुलगीही पार घाबरून गेली असून, पोलीस तिच्याकडे विचारणा करीत असल्याने ती भलतीच घाबरलीही आहे. ती पिस्तुल खरेच शेतात पडलेली होती की आणखी कुठे याचीही चौकशी पोलीस करीत आहेत. (वृत्तसंस्था)>पतीची होणार पोलीस चौकशीत्या महिलेच्या पतीचीही चौकशी सुरू आहे. तिच्या पतीने पिस्तूल आणली असेल आणि तो घरात ठेवून गेला असेल. आईला ते खेळणे वाटल्याने तिने मुलीला दिली असेल, अशी शंका पोलीस व्यक्त करीत आहेत. पतीला पोलिसांनी अटक करू नये, म्हणून पिस्तूल शेतात सापडल्याचे ती सांगत असावी, असाही पोलिसांचा अंदाज आहे. ती महिला सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलीस पतीवरच प्रश्नांचा भडिमार करीत आहेत.