शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भारतीय जवानांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये गुन्हा दाखल

By admin | Updated: April 17, 2017 08:57 IST

श्रीनगरमधील बटमालू परिसरात बीएसएफच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बीएसएफ जवानांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - जम्मू काश्मीर पोलिसांनी भारतीय जवानांविरोधात खटला दाखल केला आहे. श्रीनगरमधील बटमालू परिसरात बीएसएफच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बीएसएफ जवानांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेसाठी बीएसएफ जवानांना जबाबदार ठरवत कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. शनिवारी बटमालू येथे दगडफेक करणा-या  एका समूहाविरोधात बीएसएफच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारादरम्यान बारामुला जिल्ह्यातील 23 वर्षीय सज्जाद हुसैन शेखचा मृत्यू झाला. 
 
याप्रकरणी बीएसएफच्या 38 बटालियनचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र बाघडे यांनी जम्मू काश्मीर पोलिसांना घटनेसंबंधीचा अहवाल सुपुर्द केला आहे. बीएसएफ मुख्यालयाकडे जाणा-या बीएसएफच्या तीन गाड्यांवर काही जणांनी दगडफेक केली.  शिवाय जवानांच्या रायफलही लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. 
 
युवकाच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटमालू परिसरातील स्थानिकांना लाल चौक, बटमालू  आणि पुलवामामधील सर्व दुकानं बंद ठेवली होती. याशिवाय, सार्वजनिक वाहतूक मार्गही बंद केली होती. गेल्या शनिवार बीएसएफच्या गोळीबार युवकाच्या झालेल्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स  आणि फुटीरतावादी संघटनांनी बंदचं आव्हान केले होते.