शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इन्फोसिसचे शेअर्स प्रवर्तक विकणार ही अफवाच!

By admin | Updated: June 9, 2017 15:01 IST

इन्फोसिस या आयटीमधल्या दिग्गज कंपनीचे शेअर्स प्रमोटर्स विकणार ही अफवा असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 9 - इन्फोसिस या आयटीमधल्या दिग्गज कंपनीचे शेअर्स प्रमोटर्स विकणार ही अफवा असल्याचे सध्यातरी दिसत आहे. इन्फोसिसच्या प्रतिष्ठित सहसंस्थापकांनी २८ हजार कोटी रुपये किंमतीचे १२.७५ टक्के शेअर विकण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले होते. त्यामुळे बाजारात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, ही अफवा असल्याचे व आमचा असा कोणताही विचार नसल्याचे प्रवर्तकांनी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.
इन्फोसिस सारख्या बड्या कंपनीच्या प्रवर्तकांनी शेअर्स विकलेतर बाजारात प्रचंड उलथापालथ होईल हे उघड आहे. तीन वर्षापूर्वी प्रमोटर्सनी सक्रीय कामकाजातून अंग काढून घेतल्यावर इन्फोसिस चालविण्याच्या पद्धतीत बदल झाले म्हणून सह-संस्थापक वर्गात जास्त निराशा आहे, असं बोललं जातं होतं. त्यामुळेच ते आपला हिस्सा विकतील अशी चर्चा होती. 
इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का आणि सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्यात सुरू असलेल्या वादाचा इन्फोसिसला फटका बसणार आहे, असं बोललं जातं आहे. विशाल सिक्का आणि इतर दुसऱ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा पगार, कंपनी सोडणाऱ्या सीएफओ राजीव बन्सल यांना दिलेल्या मोठ्या पॅकेजवरून सह संस्थापकांमध्ये मोठी नाराजी होती. इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबूलाल आणि के. दिनेश यांच्याकडे सध्या इन्फोसिसची कोणतीही कार्यालयीन कामकाजाची अर्थवा मोठे निर्णय घेण्याची जबाबदारी नाहीये. 
यासंदर्भात बोलताना आपण कंपनीचे समभाग विकत असल्याचे वृत्त खोटं असल्याचं एक सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे.  इन्फोसिस सोडण्याआधी कंपनीची सूत्रे सांभाळणारे नंदन निलेकणी यांनी या विषयावर बोलायला नकार दिला आहे. 
तर दुसरीकडे  इन्फोसिस सोडण्याआधी कंपनीचा व्यवहार पाहणारे नंदन निलेकणी यांनी इन्फोसिसवर बोलायला नकार दिला आहे. त्यामुळे सध्यातरी ही अफवा असल्याचे दिसत आहे, परंतु सगळे काही आलबेल नसून विद्यमान सीईओ विशाल सिक्का न मूर्ती व निलेकणी यांच्यासह अन्य प्रवर्तक यांच्यात मतभेद असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे काही काळ कंपनीच्या घडामोडींकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 
एकाच वेळी प्रवर्तक सगळे शेअर विकण्याची अशीही शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.