शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

इन्फोसिसचे अमेरिकेत स्थानिकांना प्राधान्य

By admin | Updated: April 19, 2017 02:13 IST

अमेरिकेने व्यावसायिक व्हिसावर बंधने घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी इन्फोसिसने अमेरिकेत स्थानिक नागरिकांना अधिकाधिक नोकऱ्या

नवी दिल्ली : अमेरिकेने व्यावसायिक व्हिसावर बंधने घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी इन्फोसिसने अमेरिकेत स्थानिक नागरिकांना अधिकाधिक नोकऱ्या देण्याचे धोरण आखले आहे. अमेरिकेत विकास आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचारही कंपनीने चालविला आहे.विदेशातील बाजारात स्थानिक नागरिकांना काम देणे ही आयटी कंपन्यांसाठी महागडी बाब ठरते. तरीही इन्फोसिसमध्ये स्थानिक आणि विदेशी कर्मचारी यांची आधीपासूनच योग्य सांगड घालण्यात येत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एच-१बी व्हिसावर बंधने आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयटी कंपन्यांना आपल्या धोरणात बदल करावा लागत आहे. इन्फोसिसचे मुख्य परिचालन अधिकारी यू. बी. प्रवीण राव यांनी आपल्या गुंतवणूकदारांसोबत कॉन्फरन्स कॉलद्वारे नुकतीच चर्चा केली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, व्हिसाशी संबंधित प्रश्नावर गेल्या २४ महिन्यांपासून बारकाईने नजर ठेवून आहोत. अमेरिकेतील प्रकल्पांत स्थानिक नागरिकांची संख्या वाढवित आहोत. व्यवसायावर परिणाम करील, अशी कोणतीही अनुचित बाब सध्या तरी आढळलेली नाही. या वर्षात स्थानिकांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवू. (लोकमत न्यूज नेटवर्क)