शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणी यांना माहिती व प्रसारण मंत्रिपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 11:33 IST

स्मृती इराणी यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनाम सुपूर्द केला आहे. नायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडी शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आले असून माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
 
भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. व्यंकय्या नायडू लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेत, व्यंकय्या नायडूंना 25 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवली आहे, असंही अमित शहा म्हणाले आहेत. 
 
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर करण्यात आले आहे. दक्षिणेत भाजपाला मजबूत करण्यासाठी व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे.  व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे ज्येष्ठ आणि जाणकार नेते म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.