शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या पदवीची माहिती होणार खुली

By admin | Updated: January 10, 2017 01:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रकरणात केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठाला १९७८ च्या कागदपत्रांच्या चौकशीचे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रकरणात केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठाला १९७८ च्या कागदपत्रांच्या चौकशीचे व ती खुली करण्याचे आदेश दिले आहे. आयोगाने १९७८ साली पदवी मिळविणाऱ्यांच्या रेकॉर्डची चौकशी करायला सांगितले आहे. विद्यापीठाच्या माहिती अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती उघड करता येणार नाही, अशा स्वरूपाचे अपिल आयोगाने केले होते. आयोगाने ते फेटाळून लावले असून, विद्यापीठातून १९७८ साली बीएची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे, त्यांच्या वडिलांचे नाव, रोल नंबर, त्यांना परीक्षेत मिळालेले गुण, त्यांची टक्केवारी ही सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहे. आपण १९७८ साली दिल्ली विद्यापीठातून बीए झाल्याचे मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाचे समर्थक असलेले नीरज शर्मा यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मागवली होती. त्यावर विद्यापीठाच्या माहिती अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देता येणार नाही, असे उत्तर त्यांना दिले होते. या प्रकरणाची आयोगापुढे सुनावणी झाली, तेव्हाही विद्यापीठातर्फे हीच भूमिका घेण्यात आली. मात्र ही माहिती दिल्याने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आयुष्याला बाधा येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. यावर्षी विद्यापीठातून २ लाख विद्यार्थी बीएच्या परीक्षेला बसले आहे. ही संख्या १९७८ सालीही मोठीच होती. त्या काळात सारी माहिती डिजिटल स्वरूपात नव्हती. परिणामी ही सारी माहिती देणे अवघड आहे, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली. मात्र आयोगाने ही सर्व माहिती देण्यास सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क) दिल्ली विद्यापीठाचे रजिस्ट्रार तरुण दास यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, आम्ही नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण रेकॉर्ड तपासला आहे.  त्यातून मोदी यांची पदवी खरी असल्याचे आम्हाला आढळून आले होते. मोदी यांनी १९७८ साली पदवी परीक्षा दिली आणि १९७९ साली पदवी संपादन केली होती.