शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ची माहिती सरकारी वेबसाइटवर

By admin | Updated: April 24, 2017 00:50 IST

वृद्धापकालीन पेन्शन योजनेच्या हजारो लाभार्थींच्या ‘आधार’ कार्डांशी निगडित गुप्त माहिती शनिवारी सायंकाळी झारखंड सरकारच्या

रांची : वृद्धापकालीन पेन्शन योजनेच्या हजारो लाभार्थींच्या ‘आधार’ कार्डांशी निगडित गुप्त माहिती शनिवारी सायंकाळी झारखंड सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर झळकल्याने खळबळ तर उडालीच, पण या माहितीची गुप्तता आणि सुरक्षा याविषयी घेतल्या जाणाऱ्या शंकांनाही नवे बळ मिळाले.‘आधार’ कायद्यानुसार ‘आधार’ कार्डासाठी घेतली जाणारी संबंधित व्यक्तीची कोणतीही माहिती जाहिरपणे प्रदर्शित करण्यास मज्जाव असूनही सरकारकडूनच याची पायमल्ली व्हावी, हे विशेष धक्कादायक आहे. विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांनी या माहितीच्या गोपनीयतेविषयी वारंवार शंका उपस्थित केली असून ही माहिती चुकीच्या लोकांच्या हाती पडून दुरुपयोग होण्याच्या शक्यतेवरही त्यांनी भर दिला. सर्वोच्च न्यायालयात ‘आधार’ सक्तीला आव्हान देताना इतर मुद्द्यांखेरीज हाही मुद्दा मांडण्यात आला आहे. झारखंड सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर ही मिहीती टाकली गेली. त्यात सरकारी योजनांच्या लाभार्थींची नावे, पत्ते, आधार क्रमांक व बँक खात्यांचाही तपशील होता. ही माहिती या वेबसाइटवर नेमकी केव्हापासून उपलब्ध होती हे स्पष्ट नाही. पण शनिवारी सायंकाळपर्यंत हा माहिती या वेबसाइटवर पाहता येत होती. त्यानंतर ही वेबसाइट ब्लॉॅक करण्यात आली.झारखंड सरकारच्या सामाजिक सुरक्षा संचालनालयातर्फे ही वेबसाइट चालविली जाते. ‘प्रोग्रामिंग’च्या चुकीमुळे असे घडल्याचे सांगण्यात आले. वृद्धापकालीन पेन्शन याजनेचे झारखंडमध्ये १६ लाखांहून अधिक लाभार्थी असून त्यापैकी १५ लाखांहून लाभार्थींनी त्यांचे ‘आधार’ क्रमांक सरकारकडे दिलेले आहेत.‘आधार’ क्रमांक देणाऱ्या ‘युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’च्या (युआयडीएआय) रांचीमधील कार्यालयाने फोन करून सांगितले तेव्हा राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण खात्यास हा घोळ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वेबसाइट बंद करून अपलोड केलेली ही माहिती काढून टाकम्याची धावपळ केली गेली. (वृत्तसंस्था)