शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

कुख्यात अण्णा राऊत फरारच

By admin | Updated: January 30, 2015 00:54 IST

नागपूर : वाढदिवसाच्या दिवशीच प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून हत्या करणारा कुख्यात अनिल ऊर्फ अण्णा राऊत हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत आहे तर, तो काळ्या काचेच्या आलिशान वाहनातून फिरत असल्याची चर्चा आहे.

नागपूर : वाढदिवसाच्या दिवशीच प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून हत्या करणारा कुख्यात अनिल ऊर्फ अण्णा राऊत हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत आहे तर, तो काळ्या काचेच्या आलिशान वाहनातून फिरत असल्याची चर्चा आहे.
नरेंद्र व्यंकट पिंपळीकर (वय ३८, रा. रेवतीनगर, बेसा रोड) या प्रॉपर्टी डीलरचा रविवारी (२५ जानेवारी) वाढदिवस होता. कुटुंबीयांसोबत घरात तो वाढदिवस साजरा करीत असताना रात्री ८.३० च्या सुमारास कुख्यात अण्णा राऊतने आपल्या साथीदारासह त्याचे घर गाठले. पिंपळीकरला खाली बोलवून जबरदस्तीने आपल्या फॉर्चुनर कार (एमएच ३१/ ईएन ५१५१) मध्ये कोंबले. बनावट कागदपत्रे तयार करून पिंपळीकर आणि त्याचा साथीदार मांगिलाल या दोघांनी दुसऱ्याचा भूखंड अण्णाकडे गहाण ठेवला. त्या बदल्यात अण्णाकडून ९ लाख रुपये दोघांनी घेतले. ही बनवाबनवी उघड झाल्यामुळे संतप्त झालेल्या अण्णाने साथीदारांच्या मदतीने पिंपळीकरचे अपहरण केले आणि त्याचा अमानुष खून केला. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आरोपींनी पिंपळीकरचा मृतदेह मेडिकलमध्ये नेऊन टाकला.
हुडकेश्वर पोलिसांनी ज्योती (वय ३८) पिंपळीकर यांच्या तक्रारीवरून अण्णा राऊत आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून अण्णा फरार आहे.
तो अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून, काळ्या काचा लावलेल्या आलिशान वाहनातून इकडे तिकडे फिरत असल्याची चर्चा आहे. पाच दिवस होऊनही पोलीस त्याच्या मुसक्या बांधण्यात अपयशी ठरल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
कुख्यात अण्णावर अनेक गुन्हे दाखल असून, वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोल नाका लुटण्याच्या आरोपातून त्याची नुकतीच कोर्टातून निर्दोष सुटका झाली आहे. तत्कालीन सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी अण्णाचा बजाजनगरातील जुगार अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने आपले बस्तान अजनी आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हलविले. पोलिसांशी मधूर संबंध असल्यामुळे त्याचे अवैध धंदे बिनधास्त सुरू आहेत.
----