उद्योगासाठीचे परवाने एकाच छताखाली जिल्हाधिकारी : उद्योग सारथी उपक्रम
By admin | Updated: January 12, 2016 23:16 IST
जळगाव : उद्योजकांना उद्योग स्थापन करताना लागणारे विविध परवाने व दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्ात उद्योग सारथी या एक खिडकी योजनेचा सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांनी मध्यस्थांच्या जाळ्यात न अडकता उद्योगसारथी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.
उद्योगासाठीचे परवाने एकाच छताखाली जिल्हाधिकारी : उद्योग सारथी उपक्रम
जळगाव : उद्योजकांना उद्योग स्थापन करताना लागणारे विविध परवाने व दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्ात उद्योग सारथी या एक खिडकी योजनेचा सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांनी मध्यस्थांच्या जाळ्यात न अडकता उद्योगसारथी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग सारथी योजने संदर्भात आयोजित बैठकीत त्या मार्गदर्शन करीत होत्या. बैठकीला प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अे.एम.करे, नाशिक येथील बाष्पकेचे सहसंचालक यु.एस.मदाने, दुकाने निरीक्षक अे.एम.सौदागर, ए.आर पाटील, पी.एम.मेहर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक डी.पी.पाटील, एच.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडील उद्योग सारथी एक खिडकी माध्यम कार्यान्वित करण्यासाठी प्राप्त झालेल्या अहवालाचे वाचन केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने व नोंदणी कमीत कमी दिवसात देण्यात यावे. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग सुरू करणार्या नवीन उद्योजकांमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्या बाबींची गरज आहे, याबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी सूचना त्यांनी केली. उद्योग सारथी समितीमध्ये कामकाज यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्युत निरीक्षक, अधिकारी व उद्योजक यांच्यात समन्वय राखावा तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव, भुसावळ व चाळीसगाव क्षेत्रातील वाटप करण्यासाठी उपलब्ध भूखंडाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.