शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

भारत-पाक सीमा दोन वर्षांत सील!

By admin | Updated: October 8, 2016 05:52 IST

दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी लक्षात घेता, दोन्ही देशांतील सीमा डिसेंबर २0१८पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि तेथून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी लक्षात घेता, दोन्ही देशांतील सीमा डिसेंबर २0१८पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केली. दोन्ही देशांच्या ज्या सीमेवर नदी, समुद्र वा खाडी हा भाग आहे, तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सीमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये सीमा बंद करण्यात येणार असून, त्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन राज्यांची पाकला जोडणारी सीमा १७७८ किलोमीटर इतकी आहे. गुजरातची सीमा ५0८ किलोमीटर आणि राजस्थानची सीमा १0७३ किलोमीटर इतकी आहे. या उपक्रमाला ‘कॉम्प्रहेन्सिव बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम’ असे नाव देण्यात आले आहे. तीनपदरी काटेरी कुंपणही सर्वत्र असेल. यासंदर्भात इस्रायल सरकारची मदत घेण्यात येणार आहे.पाकिस्तानातून काश्मीरमध्ये होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि काश्मीरबरोबरच राजस्थान, गुजरात, पंजाब या राज्यांतील सीमेवरून घुसखोरीच्या शक्यतेमुळे सतत बाळगावी लागणारी सतर्कता या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामाचा आणि भारतीय सीमांचा जेसलमेरमध्ये आढावा घेतला. तसेच त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, गुजरात आणि राजस्थानचे गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा व गुलाबचंद कटारिया तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बृजराज मिश्रा यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चाही केली. राजनाथ सिंह म्हणाले की दोन देशांची एकूण सीमा ३३२३ किलोमीटरची असून, त्यापैकी २२८९ किलोमीटरची सीमा पूर्णत: बंद करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यातही २0३४ किलोमीटर सीमेवर सध्या काटेरी कुंपण आहे. पण घुसखोरीचे प्रमाण शून्यावर यावे, यासाठी तिथे अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येईल. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, रडार, लेसर यंत्रणा, रात्रीच्या अंधारातही दिसेल, अशी यंत्रणा, डेटा रेकॉर्डिंग आदींचा त्यात समावेश असेल. सीमा सुरक्षा दलाची गस्त असलेला भाग २२८९ किलोमीटरचा असून, उर्वरित भाग नियंत्रण रेषेचा आहे आणि तो लष्कराच्या ताब्यात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>सर्जिकलवरून राजकीय वाक्युद्ध‘सर्जिकल स्ट्राइक्स’वरून सुरू झालेले राजकीय वाक्युद्ध आता दोन्ही बाजूंनी पेटले असून, देशातील प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते एकमेकांवर वाक्बाण सोडत आहेत. > तडीपार झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये - कपिल सिबलस्वत:वर खुनाचे गुन्हे असणाऱ्यांनी, तडीपार झालेल्यांनी (अमित शाह यांना उद्देशून) आम्हाला शिकवू नये. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना निर्माण व्हायला भाजपाच कारणीभूत. मसूद अज़हरला भाजपा सत्तेत असताना सोडण्यात आले. त्याने पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मद संघटना स्थापन केली.पाकिस्तानची लायकी माहीत असतानाही नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी तिथे जाण्याची काय गरज होती?मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला, असे म्हणणे हा लष्कराचा अपमान आहे. भाजपाने माफी मागावी. >दलालीची भाषा काँग्रेसलाच लागू : शाहदलालीची भाषा काँग्रेसलाच लागू होते. ती त्यांनी स्वत:पुरती ठेवावी. राहुल गांधी यांच्या विधानाचा आपण निषेध करतो. स्ट्राइक्सचे आम्ही राजकारण केले नाही. सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकमध्ये असलेला गोंधळ हा पुरेसा पुरावा आहे. स्ट्राइक्स झाले नाहीत, तर मग पाकने विशेष अधिवेशन का बोलावले? शरिफ इस्लामाबादमध्येच का ठाण मांडून आहेत?, अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे, त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता का? राजीव गांधींमध्ये दोष होता का?>राजकीय प्रचारासाठी सैनिकांना वापरू नका - राहुल गांधीस्टा्रइक्सना माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र भाजपाच्या राजकीय बॅनर्स वा पोस्टर्सवर वा राजकीय प्रचारासाठी भारतीय लष्कराची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास माझा अजिबात पाठिंबा नाही. राजकीय पोस्टर्सवर भारतीय सैनिकांची छायाचित्रे छापण्यास आणि अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवण्यास माझा पूर्ण विरोध आहे. हा प्रकार जवानांच्या रक्ताची दलाली करण्यासारखा आहे. - पोलिटिकल वॉर सुरू/देश-परदेश>दलालीसारखे शब्द वापरणे चुकीचे : केजरीवालराहुल गांधी यांनी दलालीसारख्या शब्दांचा वापर करू नये, राजकीय मतभेद दूर करून सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर भारतीय सैन्यासोबत उभे राहणे गरजेचे आहे.