शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

भारत-इस्रायलमधील संबंध दृढतेच्या दिशेने

By admin | Updated: July 2, 2017 00:54 IST

नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा इस्रायल दौरा ४ जुलै रोजी सुरू होत असून, गेल्या ७0 वर्षांत त्या देशाला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा इस्रायल दौरा ४ जुलै रोजी सुरू होत असून, गेल्या ७0 वर्षांत त्या देशाला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. त्यामुळे इस्रायलमधील माध्यमे आणि लोकांमध्ये या दौऱ्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांतील संबंध या दौऱ्यामुळे अधिक दृढ होतील, असे मत इस्रायली आणि भारतीय माध्यमांनी व्यक्त केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी या दोघांची विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भेट झालेली आहे.दोन्ही देशांतील संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या ७० वर्षांमध्ये कायम नव्हता. १९४७ साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने १९४९ साली विरोध केला होता. १९५० साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापूर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपूर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. १९५३ साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दूतावास उघडण्याची परवानगी मिळाली. १९५० ते १९९० या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरूपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. १९९२ साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधिक चांगल्या स्थितीत आहेत, असे म्हणावे लागेल. पंतप्रधान भेटणार मोशेला२६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरूप बचावलेला मुलगा मोशे यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यामध्ये भेटणार आहेत. खाबाद हाउसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-बाबा मारले गेले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी मोशेच्या भेटीला येणार असल्याचे कळताच त्याचे आजी-आजोबा आनंदून गेले आहेत. ‘ज्या वेळेस भारतीय राजदूतांनी पंतप्रधान मोदी आमच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. भारत आजही आमचे दु:ख वाटून घेण्यास प्रयत्नशील असल्याचे पाहून आम्हाला फारच आनंद झाला’ अशा शब्दांमध्ये मोशेचे आजोबा राबी शिमोन रोसेनबर्ग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.द्विपक्षीय संबंध१९९२ : दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित१९९७ : इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट२000 : उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट२00३ : इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट२00६ : कृषिमंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची इस्रायल भेट२0१२ : परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट२0१४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यूयॉर्कमध्ये भेट.२0१४ : टिष्ट्वटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद२0१४ : गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट२0१५ : इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट २0१५ : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन व इस्रायलला भेट. इस्रायलला जाणारे व तेथील संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती२0१६ : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची इस्रायलला भेट. नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.२0१६ : इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांची भारताला भेट. मुंबईत खाबाद हाउसलाही दिली भेट.