शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार भारताचे मानवरहित रोव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 04:43 IST

महत्त्वाकांक्षी मोहीम; खनिज, पाण्याचा शोध

नवी दिल्ली : अंतराळ संशोधनात मोठी झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. अजुनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत मानवरहित रोव्हर उतरविणार आहे. ही अशा प्रकारची चंद्रावर आखलेली भारताची दुसरी मोहिम असेल. ती यशस्वी झाल्यास चांद्रसंशोधनाबाबत सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत भारत आणखी चार पावले पुढे जाईल.

इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनने (इस्रो) स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविलेले रोव्हर अवकाशात येत्या सोमवारी प्रक्षेपित केले जाईल. ते सहा किंवा सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. १४.१ कोटी डॉलर खर्चाच्या या चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येईल. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणे, तेथे पाण्याचा शोध घेणे अशी कामे मानवरहित रोव्हर करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकलेला नाही तिथे भारताचा रोव्हर जाणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले असून अंतराळ संशोधन व सुरक्षाविषयक बाबींमध्येही आपला देश अग्रस्थानी असावा असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.अमेरिकेनेही आखल्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमानील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन या दोन अमेरिकी अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या अपोलो-११ मोहिमेला या महिन्यात २० जुलैला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २०२४ सालापर्यंत आपल्या अंतराळवीरांना नेण्याचे स्वप्न पाहात आहे.चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा शोध भारताच्या चांद्रयान-१ मोहिमेद्वारे लागला होता. २०१३-१४ या कालावधीत मंगळाच्या कक्षेत उपग्रह नेण्याची कामगिरी भारताने केली होती.