शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

भारताचा संयम मुत्सद्दी बलवानाचा!

By admin | Updated: September 26, 2016 00:47 IST

काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेवरचा तणाव अनेक पटीने वाढला आहे

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीकाश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेवरचा तणाव अनेक पटीने वाढला आहे. भारताने आपली संरक्षण सिध्दता मजबूत करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे. ७७८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात भारतीय सैन्य तैनात केले जात आहे. शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इंधन इत्यादीची भरपूर रसदही रवाना करण्यात आली आहे. ही सारी तयारी युध्दसदृश स्थितीचा इशारा देणारी आहे. रविवारी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदींनी ‘भारताचे सैन्यदल बोलत नाही, पराक्रम करून दाखवते’ असा सूचक इशाराही दिला आहे.उरी हल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी भारत आणि पाक हे दोन्ही देश खरोखर युध्दाला सामोरे जातील काय? याचे उत्तर नकारार्थी असले, तरी संरक्षण सिध्दतेत भारत पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने पुढे आहे, या वास्तवाची जाणीव संरक्षण मंत्रालयाने करून दिली आहे.पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची जोरदार मागणी देशभर उमटली. कट्टर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या काही व्यक्ती व संघटनांनी तर यावरून युद्धज्वर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी सरकारमधील आपले सहकारी आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून उतावळी आक्रमकता दाखविण्याऐवजी मुत्सद्दी संयम राखून राजनैतिक मार्ग वापरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्याचा निर्णय घेतला. अनेकांना हे पटलेले नाही व सत्ताधारी रालोआमधील काही मित्रपक्षांनी हा कचखाऊपणा असल्याची टिकाही सुरु केली आहे. पण या प्रक्षोभक क्षणाला भारताने घेतलेला पवित्रा हा दुर्बलाचा पळपुटेपणा नाही तर बलवानाने केवळ बाहुबलाचा विचार न करता शांत डोक्याने राखलेला प्रगल्भ संयम आहे, याची प्रचिती संरक्षण मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून सहजपणे येऊ शकते. युनोच्या आमसभेत आज सुषमा स्वराज देणार पाकला उत्तर?न्यूयॉर्क : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे सोमवारी सकाळी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण होणार असून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी याच आमसभेत भारताच्या निंदानालस्तीच्या केलेल्या भाषणाला त्या सडेतोड उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. स्वराज यांचे शनिवारी येथे आगमन झाले. शरीफ यांनी प्रदीर्घ काळ केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्नच प्रामुख्याने होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की सगळे जग सुषमा स्वराज यांचे भाषण ऐकण्यास उत्सूक आहे. त्या यावेळी ७१ व्या आमसभेत भारताचे ‘व्हीजन डाक्युमेंट’ सादर करतील. चीन पाकिस्तानच्या पाठीशीपाकिस्तानवर कोणतेही ‘परकीय आक्रमण’ झाले तर त्या परिस्थितीत आमचा पाठिंबा तुम्हाला असेल, असे आश्वासन चीनने पाकिस्तानला दिले असून काश्मीरच्या वादावर पाकिस्तानचा जो पवित्रा आहे त्याला आपला पाठिंबा असल्याचेही म्हटल्याचा दावा प्रसार माध्यमांनी केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची चीनचे येथील कॉन्सुल जनरल यु बोरेन यांनी भेट घेतली त्यावेळी चीनने आपला हा संदेश त्यांना दिला असे वृत्त ‘डॉन’ने दिले. पाकिस्तानवर जर परकीय आक्रमण झाले तर पाकिस्तानला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे बोरेन म्हणाल्याचे शरीफ यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 3आम्ही काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजुने उभे होतो व आहोत आणि भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील नि:शस्त्र काश्मिरींवर होत असलेल्या अत्याचारांचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. काश्मीरचा प्रश्न काश्मिरींच्या इच्छा आणि आकांक्षांनुसार सोडविला जावा, असे यु बोरेन म्हणाले.शरीफ यांचा हा निर्लज्जपणा न्यूयॉर्क : काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीची प्रतिक्रिया ही उरी येथील हल्ल्याने व्यक्त झाली असू शकते या निष्कर्षाबद्दल भारताने रविवारी येथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरीफ यांचा निष्कर्ष हा काहीही उपयोगाचा नाही, असे परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांनी म्हटले. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. अकबर म्हणाले, ‘‘मी गुन्ह्याच्या वेळी तेथे नव्हतोच’ असे निर्लज्जपणे म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे असून ते ना न्यूयॉर्कमध्ये उपयोगाचे आहे ना लंडनमध्ये आम्ही तर असे आत्मविश्वासाने म्हणतो की त्याचा इस्लामाबादेतही उपयोग होणार नाही.