शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये भारताची विशाल मदत मोहीम

By admin | Updated: April 27, 2015 00:48 IST

भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित

नवी दिल्ली : भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित कर्मचारी सेवेत दाखल केले आहेत. नेपाळमधील स्थिती ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे भारताने म्हटले आहे.भूकंपानंतर नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांसाठी सद्भावना व्हिसा सुविधा जारी करण्यात आली आहे. पीडितांना हवाई मार्गासह रस्ते मार्गाने काढण्यासाठी बसेस आणि रूग्णवाहिकांचीही मदत घेतली जात आहे. शनिवारी १,००० लोकांना हवाई मार्गे बाहेर काढण्यात आले.भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील स्थिती आणखी गंभीर बनू शकते. कारण येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येऊ शकतात. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठीत आंतर-मंत्रालयीने पथक लवकरच नेपाळला रवाना होणार असून ते तेथील मदत आणि बचाव कार्यात समन्वय ठेवेल.जयशंकर पुढे म्हणाले की, नेपाळमध्ये लवकरात लवकर मदत आणि बचाव कार्य मोहिम राबविणे हा आमच्या अजेंड्यावरील प्रमुख मुद्दा आहे. नेपाळमधील स्थिती खूप गंभीर आहे. यावेळी गृह सचिव एल. सी. गोयल, संरक्षण सचिव आर. के. माथूर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख आर. के जैन आणि भारतीय हवामान विभागाचे प्रमुख एल. एस. राठोड हेही उपस्थित होते. गृहसचिवांनी सांगितले की, भूकंपोत्तर धक्क्यांनी आतापर्यंत भारतात ६२ जण मृत्युमुखी, तर २५९ जण जखमी झाले आहेत.