शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा जवान शहीद, मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:29 IST

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान शहीद झाला. नायक मुद्दसर अहमद शहीद झाले असून, दुसरीकडे बालाकोट सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात एक नऊ वर्षांची मुलगी ठार झाली. नायक मुद्दसर अहमद हे काश्मीरचे असून, त्यांच्यामागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अतिशय प्रामाणिक जवान आम्ही गमावला आहे, असे लष्कराने म्हटले. पाकच्या गोळीबारात मरण पावलेली सजदा हौसर ही अवघ्या नऊ वर्षांची मुलगी बारोटी गावची आहे. याशिवाय तेथील दोन रहिवासी जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)आमचे सैनिक बुडाले; पाकचा दावापाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या एका वाहनावर भारतीय सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. त्यामुळे ते वाहन नदीत बुडाले. त्यामध्ये आमचे ४ सैनिक होते असे पाकिस्तानने म्हटले आहे. पीओकेच्या मुजफ्फराबादपासून ७३ किलोमीटर दूर नीलम नदीजवळ असलेल्या एका वाहनावर भारतीय जवानांनी गोळीबार केला . त्यामुळे चार सैनिक नदीत बुडाले असं पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, तिघांचा शोध सुरू आहे. डीजीएमओमधील चर्चेनंतरही पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन दोन्ही देशांमध्ये झालेल्या डीजीएमओ स्तराच्या चर्चेमध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या गोळीबारात आपले चार सैनिक ठार झाल्याचा दावा केला. त्याचवेळी भारताने पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे सांगितले. पाकच्या कुठल्याही हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताने बजावले आहे. महत्त्वाचे पाकच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतरही पाकिस्तानने अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवासांपासून गोळीबार सुरू आहे. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.