शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचे हात पिवळे करण्याचे वय वाढले!

By admin | Updated: April 29, 2015 23:41 IST

भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत. यामुळे प्रजनन दरातही लक्षणीय घट नोंदली गेली आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. २०११ च्या जनगणना अभ्यासात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.२००१ आणि २०११ च्या जगणनेचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या काळात महिलांच्या लग्नाचे किमान वय १८.३ वरून वाढून १९.३ वर्षे झाले आहे. तसेच पुरुषांचे वयही २२.६ वरून २३.३ वर्षे झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कधीकाळी बालविवाहाला आळा घालण्यासाठी सरकारला लग्नाकरिता किमान वयाचा कायदा आणावा लागला होता. अहवालात म्हटले आहे की, पुरुष आणि महिला, दोन्हींमध्ये घटस्फोट आणि वेगळे झालेल्या दाम्पत्यांच्या प्रमाणात अंशत: वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांचे प्रमाण २०११ च्या जनगणनेत ४९.९ टक्के एवढे नोंदले गेले. २००१ मध्ये हे प्रमाण ४७.७ टक्के होते, असे वैैवाहिक स्थितीसंदर्भातील आकडेवारीत म्हटले आहे. पुरुषांबाबत हे प्रमाण २०११ मध्ये ४६.० टक्के, तर २००१ मध्ये ४३.६ टक्के होते. भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारे हा अभ्यास अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, प्रजनन दरातही घट नोंदली गेली आहे. २०११ मध्ये मुलांचा लिंगनुपात २००१ च्या तुलनेत सर्वच वयोगटात कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, युवकांच्या वयोगटात विशेषत: २० वयाखालील मुलांच्या लिंगदरात मोठी घट झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४या काळात सर्वच वयोगटांतील भारतीयांच्या आयुष्यमानात वाढ झाली आहे. १५ ते ४९ या वयोगटातील महिलांचा राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये घटला आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण प्रजनन दर २००१ ते २०११ या काळात २.५ टक्क्यांवरून घटून २.२ झाला आहे. ४विधवा महिलांचे प्रमाण २००१ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून २०११ मध्ये ७.४ टक्के झाले. विधुरांचे प्रमाण १.८ टक्क्यांवरून २.० टक्के झाले.